पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
MSF म्हणजेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत राज्यातील विविध ठिकाणी आणि मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय व इतर औद्योगिक, व्यवसायिक आस्थापनांना सशुल्क सुरक्षा व्यवस्था देण्यात आली असून अशा ठिकाणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक (PI) आणि सहा. पोलीस निरीक्षक (API) दर्जाचे अधिकारी यांची सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी (SSO) या पदांकरीता कंत्राटी तत्वावर नियुक्तीसाठी याव्दारे इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण 029 पदे या भरती मध्ये भरली जात आहेत. या भरती मध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे :- 1} वैयक्तिक माहिती (BIO-DATA), 2} शैक्षणिक कागदपत्रे, 3} सेवानिवृत्त प्रमाणपत्र / सेवानिवृत्ती ओळखपत्र, 4} निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत, 5} फोटो / पॅन कार्ड / आधार कार्ड, 6} मागील पाच वर्षाचे ACR. 11 ऑक्टोंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अधिक माहिती करिता वरती देण्यात आलेली pdf जाहिरात वाचा.