उमेदवारांनाची यादी | येथे क्लीक करा |
उमेदवारांनासाठी सूचना | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये सुरक्षा रक्षक ही पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांची यादिसह जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये 10,000 सुरक्षारक्षकांची भरती केली जात आहे. एकूण 10,000 उमेदवारांना पडताळणी साठी बोलावण्यात आले आहे. नियम व अटी : उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश देण्यात आलेला https://mssc.co.in/application/index.php ही लिंक ओपन करुन तेथे दिलेला फॉर्म ऑनलाईन व्यवस्थीत भरणे आवश्यक आहे. तसेच सदर लिंक ओपन केल्यानंतर (Privacy Policy) यावर क्लिक करुन तेथील दिलेल्या सुचना प्रमाणे फॉर्म काळजीपुर्वक भरण्यात यावा. तसेच फॉर्म मध्ये दिलेल्या जागी स्वतः चे अलीकडील काळातील रंगीत छायाचीत्र व सही अपलोड करावी, तसेच मुद्दा क्र. ७ मध्ये नमुद सर्व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या जागी अपलोड करावी. संपूर्ण माहिती भरल्यानंतरच फॉर्म सबमीट करण्यात यावा. तसेच नोंदणीच्या दिवशी येतांना फॉर्मची प्रिंट काढून सोबत आणावी. तसेच सर्व संबंधीत मुळ कागदपत्रे सोबत आणावी.
उमेदवार नोंदणीसाठी हजर राहतांना दिलेल्या लिंकवर फॉर्म भरलेला नसल्यास व येतांना त्याची प्रिंट व मुळ कागदपत्रे सोबत न आणल्यास त्यास अपात्र समजण्यात येईल, व त्याची नोंदणी होणार नाही, याची नोंद घ्यावी, ज्या उमेदवारांनी यापुर्वी ऑनलाईन पध्दतीने भरती नोंदणीचा फॉर्म भरला असेल, परंतु त्यांना प्रतिक्षाधीन (Waiting) ठेवण्यात आलेले आहे. अशा उमेदवारांनी नोंदणीच्या ठिकाणी येऊन आपले अपुर्ण असलेल्या कागदपत्राची पुर्तता केल्यास त्यांची नोंदणी केली जाईल, याची नोंद घ्यावी. भरती प्रकिये मध्ये पात्र झाल्यानंतर उमेदवाराला प्रशिक्षणासाठी हजर राहण्यासाठी त्यांचे नोंदणीच्या वेळी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश देण्यात येतील. महामंडळाने दिलेल्या दिनांक व वेळेस संबंधित प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी हजर राहताना खालील बाबीची पुर्तता करावी लागेल.
उमेदवाराचा नियुक्ती पुर्व मुलभूत प्रशिक्षणाचा कालावधी ४५ दिवसाचा असेल व महामंडळाने ठरविलेल्या महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणच्या प्रशिक्षण केंद्रात त्यास प्रशिक्षणास पाठविण्यात येईल त्या ठिकाणी त्यास वेळेस हजर राहावे लागेल. प्रशिक्षणास हजर राहताना प्रशिक्षण शुल्क म्हणुन सुरक्षा अनामत रक्कम रु. १५,०००/- भरणा करावी लागेल. (त्यापैकी रु. १०,०००/- Non-Refundable आणि रु. ५,०००/- Refundable असतील, सदरची Refundable रक्कम उमेदवारास नियुक्तीसाठी संदेश दिल्यानंतर नियुक्ती तात्काळ स्विकारल्यानंतर व एक करार कालावधी पुर्ण केल्यानंतरच परत करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. उमेदवारास प्रशिक्षणासाठी हजर होण्याचा संदेश आल्यास प्रशिक्षण केंद्रावर हजर होताना प्रशिक्षणास सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. भरती नोंदणी झाल्यानंतर सदरच्या कागदपत्राची पुर्तता करण्यात यावी. जरी उमेदवार भरती नोंदणीसाठी पात्र ठरला तरी एखाद्या उमेदवारा विरुध्द गुन्हा नोंद असल्याबाबत किवा इतर आक्षेपार्ह चारित्र्य पडताळणी अहवाल असल्यास सदर उमदेवारास प्रशिक्षण संधी देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.