MSRTC BHARTI 2025 : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 0446 रिक्त पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी 10वी / पदवीधर / ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
MSRTC BHARTI 2025 : Maharashtra State Road Transport Corporation (ST Corporation) has published an advertisement to fill new posts. A total of 0446 vacant posts are being filled in this recruitment. The recruitment advertisement has been published by Maharashtra State Road Transport Corporation.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾एकूण पदे : 0446 जागा.
◾पदे : विविध जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / पदवीधर / ITI उत्तीर्ण. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 14 वर्षापेक्षा जास्त व 30 वर्षापेक्षा कमी असावे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
1) अभियांत्रिकी पदवीधर / पदविकाधारक : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा अभियांत्रिकी शाखेतील यांत्रिकी किंवा मोटार यामधील पदवीधर / पदविकाधारक (पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदविकाधारक उमेदवारांचा विचार करण्यात येईल.)
2) व्होकेशनल (अकौन्टसी अँड ऑडीटींग) : संबंधित व्यवसायाशी संलग्न विषय कोड क्र. एम-१ / एम-२/एम-३ घेऊन एच.एस.सी. (इ. १२ वी) एम.सी.व्ही.सी. उत्तीर्ण.
3) मॅकेनिक मोटार व्हेईकल :
१) आय.टी.आय. मोटार मॅकेनिक उत्तीर्ण
२) एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण
4) शिटमेटल वर्कर :
१) आय.टी.आय. ट्रेड शिटमेटल उत्तीर्ण.
२) एस.एस.सी. (इ.१० वी पास)
5) मॅकेनिक अॅटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स :
१) आय.टी.आय. ट्रेड मॅकेनिक अॅटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण.
२) एस.एस.सी. (इ. १० वी) उत्तीर्ण.
6) वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) :
१) आय.टी.आय. ट्रेड वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) उत्तीर्ण.
२) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण.
7) पेन्टर (जनरल) :
१) आय.टी.आय. ट्रेड पेन्टर (जनरल) उत्तीर्ण
२) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण
8) मेकॅनिक डिझेल :
१) आय.टी.आय. ट्रेड डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण
२) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण
9) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक :
१) आय.टी.आय. ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण
२) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण
10) मॅकेनिक रिपेअर अॅण्ड मेन्टेनन्स ऑफ मेन्टेनन्स ऑफ हेवी व्हेईकल (व्होकेशनल) :
१) आय.टी.आय. ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण
२) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण.
◾नोकरी ठिकाण : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ, नाशिक विभाग, नाशिक.
◾शिकाऊ उमेदवारी निवडीकरिता पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक येथे शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस सोडुन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते १३.०० या वेळेत दिनांक १७.०३.२०२५ पर्यंत मोफत मिळतील.
◾उमेदवाराने अर्ज घेतल्या नंतर त्याच दिवशी अर्जातील संपुर्ण माहिती भरुन पुढील दर्शविलेल्या प्रमाणे शैक्षणिक दाखल्यांची / प्रमाणपत्राची प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रती अर्जा सोबत सादर करणे आवश्यक आहे.
अ) शाळा सोडल्याचा दाखला.
ब) शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र / गुणपत्रक (गुणपत्रकाची दोन्ही बाजु) यांत्रिक व्यवसायिक व आय.टी.आय. उत्तीर्ण गुणपत्र व प्रमाणपत्र तसेच व्होकेशनल एच.एस.सी. (१२ वी) एम.सी.व्ही.सी. (विषय कोड क्र.एम-१, एम-२ / एम-३) उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रक अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
क) मागासवर्गीय उमेदवाराकरिता विहीत नमुन्यातील सुधारित जातीचा दाखला व प्रमाणपत्राच्या प्रमाणित केलेल्या झेरॉक्स प्रती अर्जा सोबत सादर करणे अत्यावश्यक आहे.
◾आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबासाईटवर रजिष्ट्रशेन करुन रजिष्ट्रेशनची प्रिंट व सदर वेबसाईटवर दिलेल्या आपल्या व्यवसायाकरिता जाहिरातीतील पदास Apply करुन सदरची प्रिंट अर्जास जोडणे अनिवार्य आहे.
◾प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाल्यानंतर उमेदवारांना म.रा.मा.प. महामंडळाचे सेवेत सामावुन घेण्यात येणार नाही. तसेच रा.प. सेवेत सामावुन घेण्याबाबत कोणताही हक्क राहणार नाही. यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 17 मार्च 2025 ही आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.