MSRTC BHARTI 2025 : Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) तर्फे नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. 2 जिल्ह्यातील विभागासाठी नवीन पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य (M.S.W) पदव्युत्तर पदवी किंवा मानसशास्त्र विषयातील M.A. पदवी आणि समुपदेशन मानसशास्त्रातील पदविका असणे आवश्यक आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट |
यासोबतच किमान दोन वर्षांचा समुपदेशन क्षेत्रातील अनुभवही अपेक्षित आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक मानद तत्वावर केली जाणार असून मासिक मानधन ४,००० रुपये राहील. नियुक्त समुपदेशकाचे काम रा.प. महामंडळातील कर्मचाऱ्यांमधील मानसिक ताणतणाव कमी करणे, वैयक्तिक संवादातून अडचणी समजून घेणे आणि गरज असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी अहवाल पाठवणे असेल. आगाराला महिन्यात किमान तीन वेळा भेट देणे अपेक्षित आहे. नेमणुकीचा कालावधी सुरुवातीला एक वर्ष असेल, आणि कामगिरीच्या आधारे तो वाढवला जाऊ शकतो.
इच्छुक उमेदवारांनी फुलस्केप पेपरवर टंकलिखीत अर्ज करून फोटो चिकटवावा आणि सर्व आवश्यक प्रमाणपत्रे जोडून तो खालील पत्त्यावर पाठवावा. अर्ज पाठवण्याचा पत्ता: उप सचिव, कार्यासन, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: २० ऑक्टोबर २०२५, संध्याकाळी ५:४५ वाजेपर्यंत. अर्ज पाठवण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
