Mumbai High Court Bharti 2025 : तुमचे शिक्षण कमी असेल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी असू शकते. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत मूळ शाखेच्या आस्थापनेवर सफाई कामगार हे पद रिक्त आहे ते भरण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी वाचून घ्या. भरतीची सर्व माहिती, लागणारी शैक्षणिक पात्रता, मासिक वेतन, अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.
Mumbai High Court Bharti 2025 : The Mumbai High Court has issued an advertisement to fill the vacant post of Safai Kamgar at the main branch establishment under the Mumbai High Court. Eligible and interested candidates should read the official advertisement given below before applying.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय व्दारे भरती जाहिरात प्रकाशित केली आहे.
◾भरती प्रकार : मुंबई उच्च न्यायालय सारख्या मोठ्या सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾भरती पदाचे नाव : सफाई कामगार.
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवार कमीत कमी 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार ही अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 16,600 ते 52,400 रूपये मासिक वेतन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज, पुर्ण माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन.
◾वय : 18 ते 43 वर्ष दरम्यान वय असलेले उमेदवार.
◾अर्ज शुल्क : सदर भरती प्रकियेसाठी अर्ज शुल्क रुपये 300 आकारले गेले आहे.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
2) अनुभव : उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असावा.
◾निवड प्रक्रिया :
1) प्रात्यक्षिक परीक्षा (किमान पात्रता गुण – 15) – 30 गुण.
2) शारीरिक क्षमता चाचणी – 10 गुण.
3) वैयक्तिक मुलाखत – 10 गुण.
4) निवड प्रक्रियेचे एकूण गुण – 50 गुण.
◾वरील सर्व परीक्षांसाठीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.
◾एकूण पदे : 01 जागा.
◾नोकरी ठिकाण : मुंबई उच्च न्यायालय, मुंबई. (Government Job in Mumbai)
◾उमेदवारांची निवड ही प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखतीत मिळालेल्या गुर्णाच्या आधारे केली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 जानेवारी 2025.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : (फक्त स्पीड पोस्ट) प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- 400032.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.