Mumbai High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत मूळ शाखेच्या आस्थापनेवर सफाई कामगार हे पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भरतीची जाहिरात महाप्रबंधक, मुंबई येथील उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालय मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी वाचून घ्या. भरती बद्दलची आवश्यक माहिती, शैक्षणिक पात्रता, मासिक वेतन, pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Mumbai High Court Bharti 2025 : Advertisement has been published for the post of Safai Kamgar at the establishment of the parent branch under the Bombay High Court. The recruitment advertisement has been published by the General Manager, Jurisdiction of the High Court, Mumbai.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : सफाई कामगार.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार ही अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾ मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 16,600 ते 52,400 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज शुल्क : सदर भरती प्रकियेसाठी अर्ज शुल्क रुपये ३००/- (रुपये तीनशे मात्र) (सर्व प्रवर्गांसाठी) एवढे असेल.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
2) अनुभव : उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असावा.
◾निवड प्रक्रिया :
1) प्रात्यक्षिक परीक्षा (किमान पात्रता गुण – 15) – 30 गुण.
2) शारीरिक क्षमता चाचणी – 10 गुण.
3) वैयक्तिक मुलाखत – 10 गुण.
4) निवड प्रक्रियेचे एकूण गुण – 50 गुण.
◾वरील सर्व परीक्षांसाठीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.
◾एकूण पदे : 01 जागा भरल्या जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई उच्च न्यायालय, मुंबई. (Government Job in Mumbai)
◾उमेदवारांची निवड ही प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखतीत मिळालेल्या गुर्णाच्या आधारे केली जाईल.
◾या निवड प्रक्रियेत निवड समितीने घेतलेला निर्णय हा अंतिम असेल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 जानेवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : (फक्त स्पीड पोस्ट) प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- 400032.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचून घ्या.