PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या सफाई कामगार पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे / पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादीसह दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी किंवा त्या आधी पोहचेल या बेताने खालील पत्यावर फक्त स्पीड पोस्टाद्वारे (Speed Post) पाठवावेत.
स्पीड पोस्टाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातुन किंवा वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उपरोक्त अर्ज/कागदपत्रे इत्यादी समाविष्ट असलेल्या लिफाफ्यावर ‘सफाई कामगार पदासाठी अर्ज” असे लिहावे. सदर प्रक्रिये दरम्यान घेतल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीसाठी उमेदवारास स्वखर्चाने हजर रहावे लागेल. नियुक्ती व अल्पसुचीचे (shortlisting) सर्व अधिकार प्रशासन, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.
सफाई कामगार हे एकाकी पद (Isolated Post) असून, सदर पदास भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत यांची उमेदवाराने नोंद घ्यावी. 20 जानेवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.