पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
मुंबई महानगरपालिका येथे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. नियम व अटी : कंत्राटी पध्दतीने नियुक्त कर्मचा-यांना नियमित पदांकरिता असणारे कोणतेही फायदे मिळणार नाहीत. तसेच आवश्यकता नसल्यास त्यांची नियुक्ती कोणत्याही क्षणी संपुष्टात येईल. कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या उमेदवारांची सेवा आवश्यकता वाटल्यास कधीही तसेच कोणतीही पूर्व सूचना न देता समाप्त करण्यात येईल.
कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या उमेदवारांना नियमित नियुक्तीसाठी भविष्यात हक्क सांगता येणार नाही. नियमित नियुक्तीच्या वेळी कंत्राटी तत्वावर केलेचे काम विचारात घेतले जाणार नाही. पोस्टाच्या विलंबामुळे कोणतीही माहिती प्राप्त होण्यास किंवा कळविण्यास विलंब झाला तर त्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेची राहणार नाही. नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती / प्रमाणपत्रे / कागदपत्रे सादर केल्याचे किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी रद्दबातल करण्यात येईल. तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार मा. अधिष्ठाता, टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय आणि बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय यांना आहेत. विहित नमुन्यात सर्व बाबींची पूर्तता केलेले अर्ज, अलिकडेच काढलेल्या पासपोर्ट आकाराचे छायाचित्र त्यावर चिकटवून अर्ज दिलेल्या पत्त्यावर सुट्ट्या वगळून सादर करावेत. विहित दिनांक / वेळेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत किंवा सदर बाबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार स्विकारला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.