पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
मुंबई मध्ये नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. मुंबई महानगरपालिका मध्ये कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ग्रेड ‘क’ ही एकूण 01846 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 25,500 ते 81,900 मासिक वेतन दिले जाणार नाही. या भरतीसाठी पदवीधर व 10वी पास असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीसाठी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी: किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. उमेदवाराने अर्जासोबत खालील नमुद केलेली शैक्षणिक, व्यवसायिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच सदर प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच त्यांच्या साक्षांकित प्रती नियुक्तीपूर्वी तपासणीकरिता सादर करणे आवश्यक आहे :- उमेदवाराने शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, अधिवास प्रमाणपत्र, अर्हतेमध्ये नमुद केलेले विहित शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रके व प्रमाणपत्र, मराठी व इंग्रजी भाषेचे विहित गतीचे टंकलेखनाचे प्रमाणपत्र व संगणक ज्ञानाचे एमएससीआयटी प्रमाणपत्र तसेच मागासवर्ग उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आणि अ.जा. व अ.ज. प्रवर्ग वगळता इतर मागास प्रवर्गासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नवीनतम प्रमाणपत्र, अशाप्रकारे नमूद सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती, तसेच उमेदवाराची समांतर आरक्षणांतर्गत निवड झाली असल्यास, शासन निर्णयानुसार विहित प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रती सादर करणे आवश्यक असेल. 09 सप्टेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.