Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील मधील एकूण 01846 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. 10वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : This is a good opportunity if you are looking for Government Jobs of Maharashtra Government. A total of 01846 vacancies are to be filled by direct service in various departmental establishments in Mumbai Municipal Corporation.
◾भरती विभाग : मुंबई महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾एकूण पदे : या भरतीसाठी 01846 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,900 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : पात्र उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 43 वर्षे दरम्यान आहे ते उमेदवार अर्ज करू शकतील.
◾व्यावसायिक पात्रता : 1] उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह उत्तीर्ण असावा. 2] उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. 3] उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. 4] उमेदवाराजवळ ‘एम.एस.सी.आय.टी’ परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾उमेदवाराचा ई-मेल आयडी आणि पत्रव्यवहाराचा पत्ता (पिनकोड सह) सुस्पष्ट व पूर्ण असावा.
◾विवाहित महिला उमेदवारांनी नावात बदल झाल्याबाबत, विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच राजपत्राची प्रत सादर करावी, ते नसल्यास विवाहित महिला विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करु शकतात.
◾उमेदवाराला कोणत्याही न्यायालयाने नैतिक अधःपतन किंवा फौजदारी स्वरुपाच्या खटल्यात शिक्षा दिली असल्यास तो भरतीसाठी अपात्र ठरेल.
◾शेवटची दिनांक : 09 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.