Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालयात Emergency Lab साठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वैद्यकीय महाविद्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : BA under Brihanmumbai Municipal Corporation. Nair Dharma. Hospital and Tow. Res. Applications are invited from eligible candidates to fill the vacant posts of Laboratory Technician for Emergency Lab in Medical College.
◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वैद्यकीय महाविद्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे.
◾पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज मागविण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : या भरतीसाठी 18 ते 33 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : एका वर्षाकरीता दर 40 दिवसानी एका दिवसाचा खंड देऊन कंत्राटी तत्वावर हे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾व्यावसायिक पात्रता :
▪️उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची विज्ञान शाखेतील (Degree in B.Sc.) पदवी धारण करणारा असावा अणि मान्यताप्राप्त विद्यापिठाची (Maharashtra State Board of Technical Education) ची / डी.एम.एल.टी. पदविका (Diploma in Medical Laboratory Technology) पदविका उत्तीर्ण झालेला असावा. (B.sc + DMLT)
किंव्हा
▪️उमेदवाराने 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचेकडील निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसीन या विषयातील (Bachelor of Paramedical Technology in Laboratory Medicine) पदवी धारण करणारा असावा.
◾एकूण पदे : 018 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾कंत्राट तत्वावर भरण्यात येणारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद नियमित स्वरुपातील नसून तात्पुरत्या स्वरुपात कंत्राट कालावधी करिता असेल.
◾उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक अर्हता / व्यवसायिक अर्हता/संबंधित गुणपत्रिका प्रमाणित प्रत जोडावी.
◾खालील कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती सदर अर्जासोबत सादर कराव्यात. 1} आधार कार्ड 2} पॅन कार्ड 3} वास्तव्याचा पुरावा (आधार कार्ड / पासपोर्ट / वाहनचालक परवाना / वीज देयक [बिल] / दुरध्वनी 4} ओळख पुरावा (आधार कार्ड / वाहनचालक परवाना / पारपत्र [पासपोर्ट / मतदान ओळखपत्र) देयक [बिल]) 5} माध्यमिक शालांत (एसएससी) परिक्षेची गुणपत्रिका 6} उच्च माध्यामिक (एचएससी) परिक्षेची गुणपत्रिका 7} पदवी परिक्षेची गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र (असल्यास) 8} डी.एम.एल.टी. पदविका उत्तीर्ण प्रमाणपत्र 9} दोन पासपोर्ट आकाराची अलिकडील काढलेली छायाचित्रे 10} शैक्षणिक अर्हता व अनुभव या संबंधित असलेले इतर कागदपत्रे. 11} अनुभव प्रमाणपत्र.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.