महाराष्ट्र शासन : मुंबई महानगरपालिका येथे चांगल्या वेतनाची नोकरी मिळवा | एकूण पदे – 0178 जागा | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधत आहात? मुंबई महानगरपालिकेतील ‘करनिर्धारण व संकलन’ विभागांच्या आस्थापनेवरील गट-क मधील संवर्गातील नमूद केलेली 0178 नवीन रिक्त पदे, ऑनलाईन अर्ज मागवून, सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. या भरतीची पुर्ण pdf जाहिरात मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : Looking for Govt Jobs? Mentioned 0178 new vacancies in Group-C cadre on establishment of 'Assessment and Collection' Departments in Mumbai Municipal Corporation are to be filled by direct service by inviting online application.

भरती विभाग : मुंबई महानगरपालिका (bmc) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) व्दारे ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये 0178 पदे भरण्यात येत आहेत.
पदाचे नाव : खाली देण्यात आलेली PDF जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 29,200 ते 92,300 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास, त्या उमेदवाराने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील.
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : 20 सप्टेंबर 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे.
अर्ज मागविण्याची पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 45 वर्ष.
भरती कालावधी : सदर भरती अंतर्गत नियुक्ती तीन वर्षाच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी असेल व तीन वर्षानंतरचे सेवासातत्य उमेदवाराच्या परिविक्षाधिन कालावधीतील कामगिरीवर अवलंबून असेल.
पदाचे नाव : निरीक्षक गट ‘क’.
व्यावसायिक पात्रता :
▪️उमेदवाराने कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
▪️उमेदवार माध्यमिक शालेय प्रमाणपत्र किंवा समकक्ष किंवा उच्च परीक्षा मराठी विषयात 100 गुणांसह उत्तीर्ण असावा (निम्न स्तर किंवा उच्च स्तर).
▪️उमेदवाराकडे मराठी आणि इंग्रजी भाषेतील सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र प्रत्येकी ३० शब्द प्रति मिनिट टंकलेखन गती असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये ही पदे भरण्यात येणार आहे.
◾निरीक्षक या संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या रिक्त पदांकरिता घेण्यात येणारी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षा, महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रातील मुंबई शहरासह महाराष्ट्र राज्याच्या इतर शहरांमध्ये घेण्यात येईल.
भरतीप्रक्रियेशी संबंधित सर्व बाबींबाबत महानगरपालिकेचा निर्णय हा अंतिम राहील. तसेच तो सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील. याबाबत केल्या जाणा-या विचारणा व पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.
◾ऑनलाइन परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांची क्षमता कमी असल्यास किंवा काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घेतल्या जातील.
◾पदभरतीची प्रक्रिया अत्यंत तर्कशुद्ध व पारदर्शक पद्धतीने गुणवत्तेच्या आधारे पाडली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये.
◾उमेदवारांनी उपरोक्त जाहिरातीचे संपुर्ण अवलोकन करुन, विहीत मुदतीत पुढे नमूद केलेल्या संकेतस्तथळावर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
◾निवड झालेल्या उमेदवाराची सदर पदावर नियुक्ती करण्यापूर्वी सदर पदाच्या 01 महिन्याच्या वेतनाएवढी रोख रक्कम, ‘सुरक्षा अनामत रक्कम’ म्हणून उमेदवारास भरावी लागेल किंवा तशा आशयाचे क्षतीपूर्ती बंधपत्र सादर करावे लागेल.
◾निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय परिक्षकांकडे पाठविण्यात येईल. तसेच, दिव्यांग अरक्षणांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय मंडळाकडे पाठविण्यात येईल.
◾निवड प्रक्रियेत अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना राहतील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!