Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधताय? बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगर अभियंता खात्यात विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 690 नवीन रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येत आहेत. त्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी वाचून घ्या. भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : Looking for a government job? Brihanmumbai Municipal Corporation has published an advertisement to fill various posts in the Municipal Engineer Department. In this recruitment, a total of 690 new vacancies are being filled through direct recruitment.
◾बृहन्मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरीची चांगली संधी आहे.
◾मुंबई महानगरपालिका, नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾राज्य सरकार अंतर्गत ही सर्व नवीन रिक्त पदे भरण्यात येत आहेत.
◾एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 0690 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पगार : 41,800 ते 1,32,300 रूपये.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online).
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : कायमस्वरुपी (permanent) नोकरी मिळवा.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) : सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील अभियांत्रिकी डिप्लोमा.
▪️कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) : इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रिकल/ उत्पादन अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा.
▪️दुय्यम अभियंता (स्थापत्य) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी.
▪️दुय्यम अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) : मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधील पदवी/ इलेक्ट्रॉनिक्स/उत्पादन अभियांत्रिकीमधील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर इंजिनिअरिंग) पदवी.
◾या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येतील.
◾ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या सामाईक गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षणानुसार तात्पुरती / अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल.
◾शेवटची दिनांक : 16 डिसेंबर 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करा.