Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत (माध्यमिक आरोग्य सेवा) यांच्या अखत्यारित असलेल्या खान बहादूर भाभा रुग्णालय कुर्ला (प) च्या आस्थापनेवरील रिक्त पदे भरावयाची आहेत. त्यासाठीची निवड यादी बनविण्याकरिता सदर पदांच्या नमूद केलेल्या अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी 12वी / डिप्लोमा असणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका, वैद्यकीय अधीक्षक खा.ब. भाभा रुग्णालय कुर्ला (प) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : Vacant posts are to be filled in the establishment of Khan Bahadur Bhabha Hospital Kurla (W) under the jurisdiction of the Public Health Department (Secondary Health Services) of the Brihanmumbai Municipal Corporation. Applications are invited from interested candidates who fulfill the mentioned qualifications and conditions for the said posts for the preparation of the selection list.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका, वैद्यकीय अधीक्षक खा.ब. भाभा रुग्णालय कुर्ला (प) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 20,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 – 38 वर्षे.
◾भरती कालावधी : रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : औषधनिर्माता.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) उमेदवार राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळाच्या फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसीमधील पदवी असणे आवश्यक आहे. (पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येईल).
2) उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीकृत असावा.
3) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान ५० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
4) उमेदवार डी.ओ.ई.ए.सी.सी. सोसायटीचे सी.सी.सी. किंवा ‘ओ’ स्तर किंवा ‘ए’ स्तर किंवा ‘बी’ स्तर किंवा ‘सी’ स्तर, स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम.एस.सी.आय.टी. किंवा जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र धारक असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सुट देण्याकरिता शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी /वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
◾एकूण पदे : 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई.
◾पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो / तिने जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता निकष आणि इतर अटी पूर्ण केल्या आहेत.
◾अर्ज सोबत तसेच सोबत आधार कार्ड / पॅनकार्ड व जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रती जोडण्यात यावी.
◾उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी सूचित केले जाते की त्यांनी अर्ज भरताना खोटे, छेडछाड केलेले, बनवलेले कोणतेही तपशील देऊ नयेत किंवा कोणतीही महत्वाची माहिती लपवू नये.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 17 एप्रिल 2025 पर्यंत सकाळी 11 ते संध्या 5 कार्यालयीन वेळेत (शनिवार, रविवार साप्ताहिक सुट्टी व सार्वजनिक सुट्टी वगळून) स्वीकारण्यात येतील.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, पहिला मजला, खान बहादुर भाभा रुग्णालय बेलग्रामी रोड, कुर्ला (प) मुंबई.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.