Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या असंसर्गजन्य रोग विभागांतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO), एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू (MPW) या पदांसाठी नियुक्ती करण्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांन कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खाते मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात खाली पहा.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : Applications are invited from eligible and interested candidates for appointment to the posts of Data Entry Operator (DEO), NCD Corners MPW under the Non-Communicable Diseases Department of the Public Health Department, Mumbai Municipal Corporation.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खाते द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / पदवीधर व इतर.
◾मासिक मानधन / वेतन : 18,000 ते 40,000 रूपये.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
📑 Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️कार्यक्रम समन्वयक (Program Coordinator) :
1) MBBS / BAMS / BHMS / BDS (वैद्यकीय परिषद मान्यताप्राप्त पदवी).
2) अनुभव : आरोग्य क्षेत्रातील (सरकारी/निजी) किमान १ वर्षाचा अनुभव.
3) MS-CIT किंवा शासनमान्य संगणक प्रमाणपत्र.
▪️आहारतज्ज्ञ (Dietician) :
1) B.Sc. (Dietetics) व Nutrition & Dietetics मध्ये UGC मान्यताप्राप्त संस्थेतील Diploma/M.Sc./Masters.
2) MS-CIT किंवा शासनमान्य संगणक प्रमाणपत्र.
▪️कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant) :
1) वाणिज्य/विज्ञान/कला शाखेतील पदवी.
2) मराठी व इंग्रजी विषयासह १०० गुणांचे शिक्षण.
3) शासनमान्य इंग्रजी व मराठी टायपिंग – ३० WPM (मराठी), ४० WPM (इंग्रजी).
4) MS-CIT किंवा समकक्ष शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण. MS Word, Excel, Database, Email, Internet इ.चा ज्ञान.
▪️डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) :
1) कोणत्याही शाखेतील पदवी.
2) मराठी विषय असलेले इयत्ता १०वी/१२वी/उच्च शिक्षण.
3) MS-CIT, शासनमान्य टायपिंग कोर्स – ३० WPM (मराठी), ४० WPM (इंग्रजी), डाटा एंट्री स्पीड – ८००० key depressions/hr.
▪️MPW (NCD कॉर्नर) :
1) इयत्ता १०वी किंवा समकक्ष परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण.
2) MS-CIT किंवा शासनमान्य संगणक परीक्षा उत्तीर्ण.
◾सर्व पदांसाठी महानगरपालिकेतील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
◾एकूण पदे : 0115 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई.
◾अर्ज फक्त ऑनलाईन Google Form च्या माध्यमातून सादर करावा लागेल. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◾उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक, अनुभव, संगणक, टायपिंग इत्यादी) PDF स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे.
◾निवड प्रक्रिया : निवड मुलाखतीच्या आधारे होईल.
डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी आवश्यकतेनुसार संगणक चाचणी घेतली जाईल.
◾अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर व सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल.
◾उमेदवारांना निवड प्रक्रिया व इतर सूचना ई-मेलच्या माध्यमातून दिल्या जातील. फोनवर कोणतीही माहिती दिली जाणार नाही.
◾ई-मेल आयडी कार्यरत ठेवणे, योग्य माहिती भरणे ही सर्व जबाबदारी अर्जदाराची राहील.
◾भरती प्रक्रियेसंदर्भातील महानगरपालिकेचा निर्णय अंतिम राहील.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : ०६ मे २०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.