Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, कुटुंब कल्याण कार्यालयाच्या अंतर्गत गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (PCPNDT) कार्यक्रमासाठी विविध पदांची भरती सुरू आहे. या भरतीसाठी शिपाई, कॉम्प्युटर ऑपरेटर व इतर पदे भरली जात आहेत. ही सुवर्णसंधी पात्र उमेदवारांसाठी आहे. या भरतीची अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : Brihanmumbai Municipal Corporation, Public Health Department, Family Welfare Office is recruiting for various posts for Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques (PCPNDT) program. The posts of Peon, Computer Operator and other posts are being filled for this recruitment.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, कॉम्प्युटर ऑपरेटर व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / पदवीधर व इतर आवश्यक पात्रता. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 15,000 ते 55,000 रुपये. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज केले जात आहे.
◾वयोमर्यादा : वयोमर्यादा (1 जुलै 2025 रोजी): 18 ते 38 वर्षे.
◾भरती कालावधी : निवड झालेल्या उमेदवारांत सुरुवातीला 3 महिन्यांच्या कालावधीसाठी नेमणूक दिली जाईल व सदर कालावधीनंतर काम समाधानकारक आडळल्यास, आवश्यकतेनुसार सेवा एक दिवस खंडित करन पुढील कार्यकाल 06 महिन्यांकरीता पति दोनवर्षी वाढविण्यात येईल.
◾पदाचे नाव, आवश्यक पात्रता व वेतन :
▪️वैद्यकीय अधिकारी (Medical Officer):
1) शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी.
2) अनुभव (प्राधान्य): PCPNDT कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव.
3) पदे: 3
4) मासिक वेतन: ₹55,000/-
6) वयोमर्यादा (1 जुलै 2025 रोजी): 18 ते 65 वर्ष.
▪️विधी सल्लागार (Legal Advisor):
1) शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून L.L.B. पदवी आणि कायद्यातील इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी.
2) अनुभव (प्राधान्य): PCPNDT कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव.
3) पदे: 1
4) मासिक वेतन: ₹40,000/-
5) वयोमर्यादा (1 जुलै 2025 रोजी): 18 ते 45 वर्षे.
▪️संगणक चालक (Computer Operator):
1) शैक्षणिक पात्रता: विद्यापीठाची पदवी, मराठी टायपिंग किमान 30 श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग किमान 40 श.प्र.मि. आणि मराठी भाषेचे ज्ञान.
2) अनुभव (प्राधान्य): PCPNDT कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव.
3) पदे: 2
4) मासिक वेतन: ₹18,000/-
5) वयोमर्यादा (1 जुलै 2025 रोजी): 18 ते 38 वर्षे
▪️शिपाई (Peon):
1) शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान.
2) अनुभव (प्राधान्य): PCPNDT कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव.
3) पदे: 1
4) मासिक वेतन: ₹15,500/-
◾एकूण पदे : 07 जागा.
◾नोकरी ठिकाण : मुंबई.
◾अर्ज प्रक्रिया: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 1 जुलै 2025 ते 10 जुलै 2025 दरम्यान (सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत) ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
◾मुलाखतीचे तपशील: सर्व पदांसाठी मुलाखती 23 जुलै 2025 रोजी विशेष अधिकारी, आरोग्य विभाग, एफ/दक्षिण विभाग, तिसरा मजला, खोली क्र. 46, येथे घेण्यात येतील.
◾ही महानगरपालिकेची कायमस्वरूपी पदे नाहीत. उमेदवारांनी मुलाखतीस येताना भरलेला अर्ज, मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायाप्रती सोबत आणाव्यात. निवड प्रक्रिया शैक्षणिक पात्रता आणि कामाच्या अनुभवावर आधारित असेल.