मुंबई महानगरपालिका मध्ये 12वी / पदवीधर / डिप्लोमा व इतर | एकूण पदे – 051 जागा | वेतन – 20,000 ते 60,000 रूपये.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, मुंबई महानगरपालिके अंतर्गत, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थे करिता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे निव्वळ कंत्राटी स्वरूपात व करार पध्दतीने मानधन तत्त्वावर करावयाची आहे. सर्व सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अर्ज विहित केलेल्या पध्दतीनुसारच सादर करावा. अर्जामध्ये दिलेल्या नमुद माहितीच्या आधारे व मुलाखती दरम्यान सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या/कागद पत्रांच्या आधारे उमेदवार पात्र व अपात्र ठरविण्यात येईल. व त्या आधारे त्याचा समावेश पुढील निवड प्रक्रियेत करण्यात येईल.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवाराची निवड झाली असा होणार नाही. निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी किंवा उमेदवाराच्या निवडी नंतर अर्जदार विहित अर्हता धारण करीत नसल्याने किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवाराची उमेदवारी / निवड तात्काळ रद्द करण्यात येईल. सर्व उमेदवारांनी खालील कार्यलयात उपलब्ध फॉर्म मध्येच अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिका स्तरावरील रिक्त पदाकरिता ११ अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्याची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मुदती नंतर सादर करण्यात येणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. (टपालाने / कुरीयरने सादर करण्यात आलेले अर्ज विहीत कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी, उशीरा प्राप्त अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. अर्जदाराने प्रत्यक्ष भरलेल्या फॉर्मची प्रत या कार्यालयास प्राप्त नसल्यास असा अर्ज अपूर्ण समजण्यात येऊन तो रद करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. वयाच्या ६० किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या उमेदवारदांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कडून प्राप्त केलेले शारिरीक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधन कारक राहील. उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे. अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.

माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाण पत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीखच अर्जात नमूद करावी. जाहिरात प्रसिध्द केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय (दिवस, महिने व वर्ष) अर्जात अचूक नमुद करावे. अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette) अर्जा सोबत सादर करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःचा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखती संदर्भात देण्यात येणा-या सुचना ई-मेलव्दारे देण्यात येतील. पात्र उमेदवारांची यादी उपरोक्त नमुद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर ई-मेल आयडी पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.

पदभरतीबाबत पात्र/अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी आणि पदभरती बाबतच्या आवश्यक सुचना व सुधारणा वेळोवेळी सदर www.nrhm.maharashtra.gov.in, https://portal.mcgm.gov.in/ संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येतील याकरिता वेळोवेळी संकेतस्थळावर भेट देणे देखील बंधनकारक आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवास आहे किंवा कसे हे नमूद करणे आवश्यक आहे, असल्यास त्याबाबतचे विहीत प्रमाणपत्र (Domicile Certificate) अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराने आपला जातीचा तपशील अचूकपणे नमूद करावा. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात मोडणा-या उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा अशा उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात येतील.

अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेले गुण व गुणांची टक्केवारी अचूकपणे नमूद करावी. ग्रेड अथवा अन्य श्रेणी नमूद न करता गुण व गुणांची टक्केवारी नमूद करणे अनिवार्य आहे. प्रमाणपत्रात नमूद गुण व गुणांची टक्केवारी अर्जात नमुद टक्केवारी न जुळल्यास असे अर्ज नामंजूर करण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांचे कार्यालय, पहिला माळा, बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊस समोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकली (पू), मुंबई – ४०००१२ येथे दिनांक ११/०४/२०२५ ते २५/०४/२०२५ पर्यंत अर्ज सादर करावे.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!