पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र शासनची नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये निरीक्षक गट ‘क’ ही पदे भरली जाणार आहेत. या भरती मध्ये एकूण 0178 पदे भरली जात आहेत. जे उमेदवार मुंबई सारख्या ठिकाणी सरकारी नोकरी शोधत आहेत त्यांना ही बातमी चांगली संधी असू शकते. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा: अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांकरिता: किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे, मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता: किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरिता: 18 वर्षे व कमाल 45 वर्षे.
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 29,200 ते 92,300 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. नियम व अटी : या भरतीच्या परीक्षेच्या व्यवस्थापनामध्ये काही समस्या उद्भवल्यास त्याचा परिणाम ऑनलाइन परीक्षेवर किंवा निकालावर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये परीक्षेस होणारा विलंब, उमेदवारांवर होणारा परिणाम, तसेच उमेदवारांना पुन्हा परीक्षा देण्यास लागू नये यासह सर्व बाबींचे निराकरण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न परीक्षा आयोजित करणा-या संस्थेद्वारा करण्यात येईल. तथापि, अशा परिस्थितीमध्ये जे उमेदवार सहकार्य करण्यास इच्छुक नसतील अशा उमेदवारांना भरती प्रक्रियेमधून पुर्णतः वगळण्यात येईल.
निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर उमेदवाराने चुकीची माहिती दिली किंवा भरतीप्रक्रियेचे उल्लंघन केल्याची बाब निदर्शनास आल्यास त्याला / तिला निवड प्रक्रियेदरम्यान अपात्र ठरविण्यात येऊन भविष्यात संस्थेच्या (बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या) कोणत्याही भरतीप्रक्रियेस उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच सदर बाब भरतीप्रक्रियेनंतर निदर्शनास आल्यास पुर्वलक्षी प्रभावाने उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल. जर एखाद्या उमेदवाराने नियुक्तीवेळी “निरीक्षक” पद स्वीकारण्यास कोणत्याही कारणाने नकार दिल्यास किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही कारणास्तव सदर पदावर काम करण्यास नकार दिल्यास, त्याची सदर पदावरील निवड रद्द होईल. 20 सप्टेंबर 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे तर 19 ऑक्टोबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आहे.