मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी सुवर्णसंधी | मासिक वेतन : 20,000 ते 50,000 रुपये | आजच अर्ज करा.

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
वेबसाईट
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

मुंबई महानगरपालिका अंतर्गत एल.टी.एम.एस. रुग्णालयात विविध तांत्रिक आणि आरोग्यविषयक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. भरती ही ठराविक कालावधीसाठी असून अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

रिक्त पदांचा तपशील – या भरतीअंतर्गत खालील पदांसाठी एकूण १९ रिक्त जागा उपलब्ध आहेत:
1) क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट.
2) ऑडिओलॉजी कम स्पीच थेरपिस्ट.
3) स्पीच थेरपिस्ट -सी-ऑडिओलॉजिस्ट.
4) ब्लड बँक टेक्निशियन.
5) ई.सी.जी. टेक्निशियन.
6) न्यूरोलॉजी टेक्निशियन.
7) संजीव टेक्निशियन.
8) लॅबोरेटरी टेक्निशियन.
9) ऑप्टोमेट्रिस्ट.
वरील पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव व तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे (अर्ज करताना मूळ अधिसूचना पाहावी).

वेतनमान:
निवड झालेल्या उमेदवारांना रु. २०,०००/- ते रु. ५०,०००/- पर्यंत दरमहा मानधन दिले जाईल. वेतन पदाच्या प्रकारानुसार ठरवले जाईल.
वयोमर्यादा:
उमेदवारांचे वय १८ वर्षे ते ३८ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. वयाची गणना शासन नियमांनुसार केली जाईल.
अर्ज प्रक्रिया:
अर्ज करण्याची प्रक्रिया फक्त ऑफलाइन असून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज खालील पत्त्यावर सादर करावेत: एल.टी.एमएस. रुग्णालयाचा आवक विभाग.
महत्त्वाच्या तारखा:
1) अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: २१ जुलै २०२५.
2) अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ०१ ऑगस्ट २०२५.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप Follow करा ➤ MN Nokari Logo