मुंबई महानगरपालिका मध्ये 40,000 रूपये वेतनाची नोकरी मिळविण्याची संधी! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा

मुंबई मध्ये नोकरी शोधत असाल तर ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये भौतिकोपचार तज्ञ या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. नियम व अटी : उमेदवाराला कोणत्याही न्यायालयात नैतिक अधःपतन किंवा फौजदारी स्वरुपाच्या खटल्यात शिक्षा दिली असल्यास, तसेच उमेदवाराविरुध्द पोलिस चौकशी/ न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास / शिक्षा झालेली असल्यास उमेदवाराने त्याबाबत माहिती देणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

निवडप्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती/ प्रमाणपत्रे/ कागदपत्रे सादर केल्यास किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्दबातल करण्यात येईल. तसेच नियुक्ती झालेली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल. प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना आहेत. उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखचनि उपस्थित रहावे लागेल. निवड झालेल्या उमेदवारांस रुपये 200/- च्या बंधपत्रावर विहित नमुन्यातील कंत्राट करार करणे आवश्यक असून सदरहू खर्च संबंधित उमेदवारास करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

error: Content is protected !!