पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
मुंबई मध्ये नोकरी शोधत असला तर ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी. माता वैष्णो देवी महाविद्यालय मुंबई मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. या भरती मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 08 जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 08 जुलै 2024 ही आहे. नियम व अटी : जाहिरातीतील नमुद पदांकरीता विहित केलेली शैक्षणिक अर्हता मुलाखतीच्या दिनांकापुर्वी पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्या संदर्भातील सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र तसेच नॉन क्रिमीलेअर मध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (EWS) उमेदवारांकरीता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक राआधो-४०१९/प्र.क्र.३१/१६-अ, दिनांक ३१ मे २०२१ अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्यावेळी सादर करणे आवश्यक राहील. भरतीप्रक्रियेबाबतचा निकाल तसेच इतर सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केल्या जातील त्याकरीता उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट द्यावी.
मुलाखतीअंती निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना त्यांच्या मुळ शैक्षणिक व अनुभवाच्या प्रमाणपत्रांची तपासणी केल्यानंतरच नियुक्तीपत्र देण्यात येईल. अर्ज सादर करतांना उमेदवाराने सादर केलेली माहिती/प्रमाणपत्रे चुकीची/खोटी आढळल्यास त्याची निवड तात्काळ रद्द करण्यात येईल व तो उमेदवार कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल. कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याकडून आवश्यक अटी व शर्ती अंतर्भुत करुन करारनामा करुन घेण्यात येईल. उपरोक्त पदांवर हंगामी स्वरुपातील नियुक्त कर्मचाऱ्यांची, आवश्यकतेनुसार कोणतीही पूर्वसूचना/कारणे न देता सेवा समाप्त करण्याचे अधिकार विद्यापीठ प्रशासनास राहतील.