पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
4थी / 10वी / 12वी उत्तीर्ण असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. मडगाव नगर पालिका मडगाव, गोवा मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये कनिष्ठ विभाग लिपिक, साइट पर्यवेक्षक, सहायक गवंडी ही 013 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
नियुक्ती नियम / जाहिरातीनुसार निकषांची पूर्तता करू शकत असरणारे पात्र उमेदवारच केवळ अर्ज सादर करू शकतात. जन्म दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, वैध रोजगार विनिमय नोंदणी पत्र, १५ वर्षे रहिवासाचे प्रमाणपत्र आणि सक्षम प्राधिकृतीकडून जारी करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र इ. कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तसेच विहित नमुन्यातील अर्जावर चिकटविण्यात आलेले पासपोर्ट आकारातील छायाचित्र गासोबत आपले अर्ज या कार्यालयाकडे दि. 23 ऑक्टोंबर ते 11 नोव्हेंबर 2024 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत प्रत्यक्ष पोच (हँड डिलिव्हरी) करावेत. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.