Nagarparishd Bharti 2025 : नगरपरिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत शहरस्तरीय कामासाठी पदांची नियुक्ती करावयाची आहे. त्याकरिता खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. भरतीची जाहिरात प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
Nagarparishd Bharti 2025 : The Municipal Council is to appoint posts for city level work under Pradhan Mantri Awas Yojana (PMAY). Applications are invited from candidates fulfilling the following eligibility criteria.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : नगरपरिषद मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 35,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत.
◾भरती कालावधी : 11 महिन्याकरिता कंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहर स्तरीय तांत्रिक कक्षातील तज्ञ (स्थापत्य अभियंता).
◾इतर आवश्यक पात्रता : Civil Engineer (B.Ε.) (मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी)
१) पायाभूत सुविधांच्या कामाच्या खरेदी, डिझाइन आणि पर्यवेक्षणात किमान ०२ वर्षांचा अनुभव.
२) स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर किंवा पदव्युत्तर पदवी (पदवी किंवा डिप्लोमा)
३) अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी मानके आणि प्रक्रिया निश्चित करण्यासाठी ULBS ला मदत करण्याची क्षमता.
४) नगरपालिका अभियंता किंवा इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा पूर्वीचा अनुभव हा एक अतिरिक्त फायदा असेल.
५) स्थानिक भाषेत प्रभुत्व असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : नागपूर.
◾सर्व इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी नगर परिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रांसह खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून अर्ज सादर करावे.
◾अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र सादर करावे.
◾जाहिरातीमध्ये नमूद असलेले पद अस्थायी व तात्पुरते स्वरूपात कंत्राटी नेमणुक असून या पदावरील कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी गणले जाणार नाही.
◾सदर पदाची नियुक्ती कोणतेही कारण न देता रद्द करण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांचेकडे राखून ठेवले आहे.
◾कंत्राटी पद्धतीने निवड उमेदवारांनी विहीत नमुन्यात रु. 100/- स्टॅम्प पेपरवर करारनामा करून देणे बंधनकारक राहील.
◾निवड प्रक्रिया शुल्क रु.500/- न.प. कार्यालयात रोखीने भरून व सोबत पावती जोडणे बंधनकारक राहील.
◾उपरोक्त पदाकरिता देय असलेले मानधन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्राप्त निधीवर निर्भर राहील.
◾नियुक्तीबाबत कागदपत्रे सादर करणेसंबंधाने अडचण असल्यास बांधकाम विभाग, नगरपरिषद कार्यालय डिगडोह (देवी) यांचेशी संपर्क साधावा.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यालय नगर परिषद डिगडोह (देवी), जिल्हा नागपूर.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.