Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 – 620 पदांसाठी भरतीची सुवर्णसंधी | ऑनलाईन अर्ज करा.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी नवी मुंबई महानगरपालिका घेऊन आली आहे एक सुवर्णसंधी! नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क व गट-ड संवर्गातील एकूण 620 रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची प्रक्रिया सरळसेवा पद्धतीने राबवण्यात येणार आहे. सदर जाहिरातीनुसार प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा-वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय अशा विविध विभागातील पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती राज्य शासनाच्या मान्यतेने करण्यात येत असून कायमस्वरूपी (Permanent) सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : Navi Mumbai Municipal Corporation has brought a golden opportunity for interested candidates looking for government jobs! Applications are being invited online from eligible candidates for a total of 620 vacant posts in Group-C and Group-D cadres in the Navi Mumbai Municipal Corporation establishment.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती प्राधिकृत संस्था : आयुक्त तथा प्रशासक, नवी मुंबई महानगरपालिका
भरती प्रक्रिया: सरळसेवा (Direct Recruitment)
भरती श्रेणी: राज्य शासन मान्य भरती
नोकरी ठिकाण: नवी मुंबई महानगरपालिका.
पदे : विविध जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध.
भरती एकूण पदे: 620
शैक्षणिक पात्रता:
सदर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 10वी, 12वी किंवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्हता ही संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार बदलते, त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹19,900 ते ₹63,200 या वेतनश्रेणीत पगार देण्यात येणार आहे. प्रत्येक पदासाठी वेतन वेगवेगळे असून त्याची माहिती अधिकृत जाहिरातीत देण्यात आलेली आहे.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
📑 Pdf
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 ऑनलाईन
अर्ज
येथे क्लीक करा

भरतीची पद्धत: ऑनलाईन अर्ज.
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष (शिथिलतेसाठी जाहिरात पहा)
अर्ज शुल्क:
1) खुला प्रवर्ग: ₹1000
2) मागासवर्गीय: ₹900
निवड पद्धत व इतर सूचना: परीक्षा व मुलाखतीबाबतचा तपशील, दिनांक, वेळ आणि केंद्र याबाबत माहिती उमेदवारांच्या प्रवेशपत्रामध्ये नमूद केली जाईल.
◾संवर्गानुसार पदवाटप, सामाजिक व समांतर आरक्षण, निवड पद्धत, अर्ज प्रक्रिया, अटी व शर्ती यांचा संपूर्ण तपशील अधिकृत PDF जाहिरातीत उपलब्ध आहे.
◾उमेदवारांनी फसव्या जाहिरातींपासून सावध रहावे आणि फक्त अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा.
महत्त्वाची सूचना:
उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्णपणे वाचूनच अर्ज करावा. भरतीबाबत चुकीचा अर्ज, अपूर्ण माहिती, किंवा शिफारसी यामुळे उमेदवार अपात्र ठरू शकतो. भरती संदर्भात उमेदवाराची कोणतीही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 11 एप्रिल 2025.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!