Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने आणलेली ही भरती एक अत्यंत मोठी व आशादायक संधी ठरू शकते. महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये गट-क व गट-ड संवर्गातील एकूण 620 रिक्त पदे भरण्यासाठी सरळसेवा पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी 10वी, 12वी तसेच पदवीधर उमेदवार पात्र आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज Online पद्धतीने मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 मे 2025 आहे.
▪️भरती करणारी संस्था: आयुक्त तथा प्रशासक, नवी मुंबई महानगरपालिका.
▪️पदसंख्या: एकूण 620 पदे
▪️पदांचा प्रकार: गट-क व गट-ड संवर्गातील विविध पदे
▪️शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर उमेदवार अर्जासाठी पात्र (पदाच्या आवश्यकतेनुसार पात्रता बदलू शकते)
▪️वेतनश्रेणी: रु. 19,900/- ते रु. 63,200/- पर्यंत (पदावर अवलंबून)
▪️वयोमर्यादा: 18 वर्षे ते 38 वर्षे (आरक्षणानुसार व शासकीय नियमानुसार वयोमर्यादेमध्ये सवलत लागू शकते)
▪️नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी सरकारी सेवा
▪️नोकरीचे ठिकाण: नवी मुंबई. (Government Job in navi mumbai)
▪️अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
📑 PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
▪️अर्ज प्रक्रिया: केवळ ऑनलाइन पद्धतीने www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून
▪️अर्ज शुल्क:
1) खुला प्रवर्ग: ₹1000/-
2) मागासवर्गीय प्रवर्ग: ₹900/-
▪️पदांची नावे : आरोग्य सहाय्यक (महिला), औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी, नेत्र चिकित्सा सहाय्यक, आहार तंत्रज्ञ, सुपरवायझेशन डिपार्टमेंट), सी.एस.एस.डी.तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल, इसीजी तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, डायलिसिस तंत्रज्ञ, स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M), डेंटल हायजिनिस्ट, वैद्यकीय समाजसेवक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, उद्यान अधिक्षक, कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), बायोमेडिकल इंजिनियर, कक्षसेवक (वॉर्डबॉय), कक्षसेविका/आया, शवविच्छेदन मदतनीस, लेखा लिपिक, लिपीक-टंकलेखक, उद्यान सहाय्यक, ध्वनीचालक, वायरमन (Wireman), सहाय्यक ग्रंथपाल, शस्त्रक्रियागृह सहाय्यक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप), ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M), पशुधन पर्यवेक्षक, बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक.
▪️निवड पद्धती व इतर अटी:
सदर भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड ही पदनिहाय ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. परीक्षा केंद्र, दिनांक व वेळ बाबतची माहिती उमेदवाराच्या प्रवेशपत्रात दिली जाणार आहे. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण व इतर अटी-शर्ती यांचा तपशील अधिकृत जाहिरातीत नमूद करण्यात आला आहे. उमेदवारांनी भरतीसंदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचना व अभ्यासक्रम काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
▪️अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 मे 2025
▪️भरतीसंबंधी कोणताही संभाव्य बदल, अधिसूचना अथवा अद्ययावत माहिती www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे उमेदवारांनी संकेतस्थळ नियमितपणे तपासत राहावे.
▪️१०वी, १२वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही भरती म्हणजे एक सरकारी सेवेत प्रवेश करण्याची अत्यंत महत्त्वाची संधी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत स्थिर व शासकीय नोकरी प्राप्त करण्यासाठी इच्छुकांनी लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावा.
▪️अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.