नोकरी शोधताय? Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) अंतर्गत 15 व्या वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती आरोग्य क्षेत्रात स्थिर आणि सुरक्षित नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. या भरतीत एकूण 40 रिक्त पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांनी 12 वी (विज्ञान शाखा) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज प्रत्यक्ष सादर करावा लागेल. अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस 30 ऑक्टोबर 2025 आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
12वी विज्ञान बरोबर पॅरामेडिकल अभ्यासक्रम किंवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18,000 रुपये मानधन दिले जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय कमाल 43 वर्षांपर्यंत असावे. अर्ज खालील पत्त्यावर पाठवायचा आहे:
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614.
भरती संदर्भातील अटी व शर्ती आणि सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर nmmc.gov.in उपलब्ध आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ही संधी नवी मुंबईत आरोग्य सेवेशी संबंधित काम करू इच्छिणाऱ्या आणि स्थिर उत्पन्न शोधणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरू शकते. अर्ज वेळेत सादर करणे आणि पात्रतेचे निकष पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. PDF जाहिरात वाचा.
