पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
पोलीस विभागांत नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई येथे नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये विधी अधिकारी ही एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. नियम व अटी : सदर नेमणुका हया करार पध्दतीने ११ महिन्यांसाठी करण्यात येतील. ११ महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी (जास्तीत जारन ३ वेळा ११ महिन्यांकरिता) वाढविता येईल. ३ वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही अशा उमेदवाराची पुनःश्च नियुक्ती करणे आवश्यक आहे असे सक्षम प्राधीका-याचे मत झाल्यास त्या उमेदवारास पुनःश्च निवड प्रक्रियेला समोरे जावे लागेल.
निवड केलेले उमेदवार ११ महिन्याच्या कराराच्या कालावधीत वकीली व्यवसायांशी संवधीत कोणत्याही प्रकारचे खाजगी काम / व्यवसाय नियुक्ती प्राधिका-याच्या लेखी परवानगी शिवाय करू शकणार नाही. जर नियुक्नी प्राधीका-याने सदर बाबतची परवानगी नाकारली असेल आणि परवानगी नाकारल्यावरही उमेदवाराने खाजगी व्यवसाय सुरू ठेवला असेल व तसे करण्याने शासनाच्या कामात व्यत्यय किंवा आर्थिक नुकसान होत असेल तर अशा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यात येईल. अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
भरण्यात येणारी पदे ही शासनाने वेळोवेळी आदेशित केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून कंत्राटी पध्दतीने भरण्याचे आदेशित झालेले आहे. निवड प्रक्रियेबाबतची कार्यवाही करणेचे तसेच निवड झालेल्या उमेदवारांची निवड कोणत्याही कारणास्तव व कोणत्याही टण्यावर केव्हाही खुद करण्याचे तसेच परीक्षेसंबंधीचे नियमात बदल करण्याचा अधिकार सर्वस्वी नियुक्ती प्राधिकाऱ्यास राहतील. 25 ऑक्टोबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.