नवी मुंबई पोलीस मध्ये रिक्त पद भरण्यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध! | Navi Mumbai Police Bharti 2024

Navi Mumbai Police Bharti 2024 : पोलीस आयुक्त नवी मुंबई कार्यालय अंतर्गत रिक्त पद भरावयाची आहेत. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पोलिस विभागांती नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. नवी मुंबई पोलीस मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पोलीस आयुक्त नवी मुंबई, आणि पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Navi Mumbai Police Bharti 2024 : Vacancy under Commissioner of Police Navi Mumbai office is to be filled. For that, applications are invited from the candidates who fulfill the following eligibility criteria.

भरती विभाग :  पोलीस आयुक्त, नवी मुंबई पोलीस, महाराष्ट्र राज्य द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : पोलीस विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
मासिक वेतन : या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला 35,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 62 वर्षापेक्षा जास्त नसावे.
भरती कालावधी : ११ महिन्यांकरीता पुर्णतः कंत्राटी पध्दतीने नियुक्ती दिली जाणार आहे.
पदाचे नाव : विधी अधिकारी गट-अ .
व्यावसायिक पात्रता :
1] उमेदवार मान्यताप्राप्त विदयापिठाचा कायदयाचा पदवीधर असेल व तो सनदधारक असेल.
2] विधी अधिकारी ‘गट अ’ या पदांसाठी वकीली व्यवसायाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
3] उमेदवार गुन्हेगारी विषय, सेवाविषयक, प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायदयाची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.
4] उमेदवारांस मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असेल.
एकूण पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
नोकरी ठिकाण : नवी मुंबई. (Navi Mumbai Police Bharti 2024)
◾विधी अधिकारी गट अ या पदांची नेमणूक ही पुर्णतः कंत्राटी पध्दतीने असेल. उमेदवाराला शासकीय अधिकारी / कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही. सदर नेमणुक ही करार पध्दतीने ११ महिन्यांसाठी करण्यात येईल. ११ महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी (जास्तीत जास्त ३ वेळा ११ महिन्यांकरिता) वाढविता येईल.
◾निवड केलेले उमेदवार ११ महिन्याच्या कराराच्या कालावधीत वकीली व्यवसायांशी संबधीत कोणत्याही प्रकारचे खाजगी काम / व्यवसाय नियुक्ती प्राधिका-याच्या लेखी परवानगी शिवाय करू शकणार नाही.
निवड प्रक्रिया : विधी अधिकारी – गट अ” या पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची निवड लेखी परिक्षा व मुलाखतीद्वारे करण्यांत येईल.
अ) लेखी परिक्षा ५० गुणांची व तोंडी परिक्षा २५ गुणांची घेण्यांत येईल.
ब) लेखी परिक्षेत व तोंडी परिक्षेत प्राप्त गुण एकत्रित करुन एकूण गुणानुक्रमानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची खित पदात कंत्राटी पध्दतीने नेमणूकी संबंधी कार्यवाही करण्यांत येईल.
क) कंत्राटी पध्दतीने नियुक्ती देणेसाठी कमीत कमी ६०% गुण असणे आवश्यक राहील.
◾नियुक्त केलेल्या उमेदवारास या कार्यालयामार्फत देण्यात येणारा करारनामा (Agreement) भरणे अनिवार्य राहील.
◾उमेदवाराने वर विहीत केलेल्या शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा व अनुभव या अटी दिनांक १४/१०/२०२४ रोजीपर्यत पुर्ण करणे आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व्ह बँके समोर, सेक्टर १०, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई पिनकोड-४००६१४.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!