अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे रिक्त असलेले पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सेवानिवृत्त अधिकारी – कायदे सल्लागार/विधी अधिकारी/विधी सहाय्यक हे 01 पद भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी फक्त विधी व न्याय विभागातून कायदे सल्लागार / विधी अधिकारी / विधी सहाय्यक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारीच अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 16 डिसेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे. निवड झालेल्या उमेदवारांना विहित केलेल्या नमुन्यात हमीपत्र द्यावे लागेल. अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी, फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील. उमेदवाराने सोबतच्या अर्जाच्या नमुन्यात स्वतःचे संपूर्ण नांव (आडनाव प्रथम), जन्म दिनांक, वय, लिंग (स्त्री / पुरुष), पत्रव्यवहाराचा पत्ता (पिनकोडसहीत) व मोबाईल क्रमांक, ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले त्या कार्यालयाचे नांव, सेवानिवृत्तीचा दिनांक, शासकीय सेवेत असताना मिळालेले अंतिम वेतन व पदनाम तसेच सध्या मिळणारे निवृत्तीवेतन याबाबतचा तपशिल नमुद करुन मा. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर पुणे 411 001 यांचे नावे अर्ज दि. 16/12/2024 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत पोहोचेल अशा रितीने पोस्टाने पाठवावा अथवा कार्यालयात समक्ष सादर करावा. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही www.igrmaharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळ वर भेट द्या.