
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर ही मोठी संधी आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये ही एकूण 20 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार जळगाव (jobs in Jalgaon) मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना चांगली संधी आहे. या भरतीसाठी मध्ये निवड करण्यात आल्यावर उमेदवारांना वेतन / मानधन दरमहा रु. 10,000/- ते रु. 50,000/- पर्यंत दिले जाणार आहे. या भरतीसाठी 21 – 45 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा.
नियम व अटी : भरती प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व सेवकांवर उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास अशा उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोचत सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयंसाक्षांकित केलेल्या सत्य प्रती जोडणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी अर्जदारांना स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा शासन नियमानुसार राहील. उमेदवाराने अर्जात व अर्जासोबत दिलेली माहिती व कागदपत्रे खोटी असल्यास किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी/नियुक्ती तात्काळ रदद करण्यात येईल.
अर्जाची स्विकृती किंवा तो नाकारणे याबाबत विद्यापीठामार्फत कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. जाहिरातमध्ये नमुद पदे भरणे किंवा न भरणे याचा हक्क विद्यापीठाने राखून ठेवला आहे. जाहिरातीतील पदांच्या वेतनात, अनुभव शिथिलता आणि पदसंख्या यात बदल करण्याचे अधिकार विद्यापीठाने राखून ठेवलेले आहेत. आपल्या कामाचा कालावधी, कामाचे स्वरुप व कामाचे स्थान यात बदल करण्याचे अधिकार विद्यापीठ प्रशासनाचे राहतील. वरील पदावर करावाची नेमणूकही पुर्णतः कंत्राटी स्वरुपाची असून, निवड झालेल्या उमेदवारास विद्यापीठाच्या सेवेत हक्क सांगता येणार नाही. नियुक्त उमेदवारास कोणतीही आगाऊ सूचना व कारण न देता कामावरुन कमी करण्याचा अथवा त्यांची सेवा खंडित करण्याचा अधिकार विद्यापीठास राहील.
एकापेक्षा जास्त पदांसाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक राहील. आपण रहिवास करीत असलेल्या नजीकतम पोलिस स्टेशनचा चारित्र्य पडताळणी दाखला रूजू होतांना सादर करणे बंधनकारक राहील. रूजू होते वेळी लहान कुटुंब प्रमाण पत्र सादर करणे आवश्यक राहील. अर्जासाठी शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रू २०० व मागास प्रवर्गासाठी रू १०० ऑनलाईन पध्दतीने भरणा करावी. आवश्यक दस्तायेवज च्या प्रती अर्जा सोबत जोडलेल्या नसल्यास सदर चा अर्ज अवैध ठरवण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 एप्रिल 2025 आहे. तर अर्ज सादर करण्याचा पत्ता (हार्ड कॉपी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (17 एप्रिल 2025). अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.