पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
पुर्ण माहिती | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
नोकरी पाहिजे? महाराष्ट्र अर्बन को–ऑपरेटिव्ह बॅंक फेडरेशन लि मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये कनिष्ठ लिपिक ही पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये एकूण 012 पदे भरली जात आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा २०,७६० रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. २४.०८.२०२४ रोजी किमान २२ ते कमाल ३५ वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर आणि धुळे या शाखेमध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 24 ऑगस्ट 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 सप्टेंबर 2024 ही आहे. अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची परीक्षा दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात येईल. परीक्षेचे स्थळ: अँड. एस. ए. बाहेती महाविद्यालय कॉमर्स कॉलेज, मनियार लॉ कॉलेज शेजारी, खॉजामिया शुल्क रोड, जळगाव हे आहे. नियम व अटी : 1] उमेदवाराचा मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND) असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या सुचना, संदेश व माहिती उमेद्वारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेद्वाराची राहिल. तसेच ई-मेल आय.डी. व संदेशवहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना फेडरेशन व बँक जबाबदार राहणार नाही.
2] ऑनलाईन अर्जामध्ये उमेद्वाराने त्याचे पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक राहील. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेद्वाराची राहील व याबाबत उमेद्वारास कोठेही व कोणत्याही प्रकारे तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यावर बदलता येणार नाही. उमेद्वाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असावा. सदर माहिती अथवा तपशील चूकीचा अथवा खोटा आढळल्यास सदर उमेद्वाराचा अर्ज नोकरभरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.