केंद्रीय GST आणि सीमा शुल्क विभाग, पुणे झोन मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू! | पात्रता – 10वी / ITI / इतर | वेतन – 18,000 ते 56,900 रूपये.

📑 Pdf
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 अधिकृत
संकेतस्थळ
येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीद्वारे नाविक, वंगणवाला आणि कारागीर या पदांकरिता एकूण १४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे इतकी असावी. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जून २०२५ आहे. अर्ज वेळेत सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भरती प्रक्रियेतील अर्ज पुढील पत्त्यावर पाठवायचे आहेत: अतिरिक्त आयुक्त, सीमाशुल्क, सीमाशुल्क आयुक्त पुणे कार्यालय, चौथा मजला, ‘सी’ विंग, ४१/ए, जीएसटी भवन, ससून रोड, वाडिया महाविद्यालयासमोर, पुणे – ४११००१.
सदर भरतीमुळे पुणे येथे नोकरीची संधी मिळणार असून, इच्छुकांनी सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. इच्छुक उमेदवारांनी संधीचे सोने करावे व दिलेल्या वेळेत अर्ज सादर करून सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करावा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!