अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (31 डिसेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील.) |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र शासन, वित्त विभाग अंतर्गत लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे यांचे विभाग मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये कनिष्ठ लेखापाल (गट-क) ही पदे भरली जात आहेत. एकूण 075 पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 29,200 ते 92,300 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
या भरतीसाठी उमेदवार पात्र होण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी + तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रतिमिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रति मिनीट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया सुरू ही दि.३१.१२.२०२४ रोजी १७.०० वाजल्यापासून ते दि.३०.०१.२०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत असणार आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती https://mahakosh.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवळी प्रसिध्द करण्यात येईल.
उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करुन घेण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे. परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे यांना राहतील व या संदर्भातील त्यांचा निर्णय अंतिम राहील. याबाबत कोणासह कोणताही दावा करता येणार नाही. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.