सरकारी नोकरी : 10वी / 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांची शिपाई व लिपिक पदांसाठी भरती सुरू! | वेतन – 18,000 ते 56,900 रूपये.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

सरकारी नोकरी शोधताय? प्रादेशिक सेना गट मुख्यालय, दक्षिणी कमांड (SC) पुणे येथे नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) ही एकूण 02 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये 18 ते 25 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. जे उमेदवार पुणे (Jobs in Pune) येथे नोकरी शोधत असतील त्यांना ही चांगली संधी आहे. तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नियम व अटी : अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेला अर्ज म्हणजे (17 नोव्हें 2024) अर्जदाराला कळविल्याशिवाय नाकारला जाईल. अयोग्य मार्गाने त्याच्या उमेदवारीला पाठिंबा मिळवणे अर्जदार  उमेदवारांना अपात्र ठरवले जाईल. जर एखादा उमेदवार निवडीसाठी त्याच्या उमेदवारीच्या संदर्भात कोणत्याही अनियमित किंवा अयोग्य मार्गाचा अवलंब करताना आढळल्यास आणि मंडळाने निरीक्षण केल्यानुसार इतर कोणत्याही कारणास्तव अधिकारी यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. उमेदवारांना या भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही व्यक्तीला / एजंटला कोणतेही शुल्क / शुल्क न देण्याबाबत चेतावणी देण्यात आली आहे. जर असे आढळले / असले तर उमेदवार नाकारला जाईल आणि कायदेशीर कारवाईला जबाबदार असेल.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सर्व उमेदवारांनी दलाल आणि एजंटपासून सावध राहणे आवश्यक आहे आणि अशी कोणतीही व्यक्ती (ती) कोणत्याही उमेदवाराच्या संपर्कात आल्यास ते टेरिटोरियल आर्मी ग्रुप हेडक्वार्टर सदर्न कमांड, पुणे यांना कळवावे अशी विनंती केली जाते. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: प्रादेशिक सेना गट मुख्यालय दक्षिणी कमांड, ASI समोर, मुंढवा रोड, घोरपडी, पुणे-411001. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!