
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी विभागांत नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये शिपाई, कृषी सहाय्यक, वायरमन, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, मदतनीस, पहारेकरी व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही 7वी / 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी फक्त डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त (विद्यापीठ प्रकल्पग्रस्त) अर्ज करू शकणार आहेत.
विद्यापीठाकरिता संपादित झालेल्या संपूर्ण जमिनीचा ताबा प्रकल्पबाधित कुटुंबियांनी विद्यापीठाकडे दिलेला असल्याचे रु.५००/- च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्रातील माहिती चुकीची अथवा खोटी आढळल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. उमेदवारास एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र अर्ज, आवश्यक त्या कागदपत्रांसहित सादर करुन, त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्का भरणे बंधनकारक राहील. (अर्जासोबत कोणतीही मूळ प्रमाणपत्रे जोडू नयेत.) अर्जदाराने सोबतच्या विहित नमुन्यामध्ये अर्ज संगणकावर टंकलिखित करून आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती व शुल्कासह मुदतीत सादर करावा, मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा तसेच अपूर्ण भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
विद्यापीठ प्रकल्पग्रस्त असल्यायावत संबंधित जिलाधिकारी/ जिल्हा पुनर्वसन अधिकारी/ उपविभागीय अधिकारी दापोली यांचेकडील विहित नमुन्यातील वैध प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची सत्यप्रत अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. पदासाठी विहीत केलेला अनुभव, आरक्षण, शैक्षणिक अर्हता व इतर आवश्यक प्रमाणपत्र उमेदवाराने दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी धारण करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी जाहिरातीला अनुसरुन अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित पदास ते पात्र असल्याची खात्री करुन घ्यावी. पात्रतेबाबत नंतर कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही. उमेदवाराने नावातील बदलाबाबत राजपत्र / विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
रिक्त पदासाठी जाहिरात देण्यांत आली याचा अर्थ जाहिरातीत नमूद केलेली सर्व पदे भरली जातील असा होत नाही. याबाबतचा पूर्ण अधिकार विद्यापीठाच्या अखत्यारित राहील. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता/पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही. भरती प्रक्रिये दरम्यान जर एखादया उमेदवाराने सादर केलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अशा उमेदवाराचा अर्ज भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टण्यात अपात्र ठरविण्यात येईल. जाहिरातीतील कोणत्याही पदावर निवड करुन घेण्यासाठी उमेदवाराने अयोग्य मार्गाचा अवलंब केल्यास संबंधित उमेदवाराला भरती प्रक्रियेतून अपात्र ठरविणेत येईल.
परीक्षा स्थगित करणे, रतूद करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व प्रवर्गनिहाय पद संख्येमध्ये बदल करणे, परीक्षेची तारीख व ठिकाणात बदल करण्यांचे अधिकार विद्यापीठ नियुक्ती प्राधिकारी व त्यांचे नियंत्रण अधिकारी यांचेकडे राखून ठेवण्यांत आलेले आहेत. संपूर्ण पदभरती प्रक्रियेबाबतचा तपशिल, परीक्षेचा निकाल वेळोवेळी http://www.dbskkv.org. या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत येईल. त्यामुळे उमेदवारांनी पदभरतीच्या काळात पदभरतीसंदर्भात संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती नियमितपणे पाहणे आवश्यक आहे.