
पुर्ण अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण करीता गडहिंग्लज नगरपरिषदेला मदत करण्याकरीता एकत्रित वेतनावर तात्पुरत्या स्वरुपात केवळ ११ महिन्यांसाठी शहर समन्वयक (City Co-ordinator) यांची नियुक्ती करावयाची आहे. खालील नमूद केलेले कंत्राटी पद भरण्यासाठी दिनांक ०७/०३/२०२५ ते दिनांक १३/०३/२०२५ रोजी पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत गडहिंग्लज नगरपरिषद, गडहिंग्लज येथे विहीत नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रासह सीलबंद लिफाफ्यात स्वीकारण्यात येणार आहे.
विहीत नमुना अर्ज नगरपरिषद कार्यालयात पाहावयास मिळेल. तरी इच्छुक /पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक, अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विहीत मुदतीत सादर करावा. गडहिंग्लज नगर परिषद मध्ये 01पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन: दरमहा रु. 45,000 दिले जाणार आहे. या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे. गडहिंग्लज नगर परिषद, जि. कोल्हापूर हा अर्ज स्विकारण्याचा पत्ता आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.