
जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
पदवीधर उत्तीर्ण असाल आणि काम शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. नेहरू युवा केंद्र संघटन भरती मध्ये राष्ट्रीय युवा स्वयंसेवक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी शिक्षण घेणारा किंवा पदवीधर किंवा पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ही 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 29 वर्षे असणे आवश्यक आहे.
निवड करण्यात आल्यावर उमेदवारांना मानधन: दरमहा रु. 5000 दिले जाणार आहे. नोकरी ठिकाण हे छत्रपती संभाजीनगर / जालना जिल्हा असणार आहे. भारत सरकार तरुणांना ‘डिजिटल कृषी मिशनच्या’ अंमलबजावणीमध्ये सहभागी करून घेऊ इच्छित आहे, तसेच युवांना स्वयंसेवी गटांमध्ये संघटित करून त्यांची ऊर्जा आणि क्षमता राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी वापरण्यासाठी उत्सुक आहे. तुम्हाला आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, लिंगभेद आणि इतर सामाजिक समस्यांवर आधारित मोहिमा /जागरूकता कार्यक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यास सांगितले जाऊ शकते आणि आपत्कालीन परिस्थितीत आवश्यकतेनुसार विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला मदत करण्यास सांगितले जाऊ शकते.
तुम्ही ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 फेब्रुवारी 2025 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: नेहरू युवा केंद्र, छत्रपती संभाजीनगर / जालना / नाशिक. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.