
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नाशिक महानगरपालिका शहर बस सेवेकरिता कार्यरत नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) करिता महाव्यवस्थापक (प्रशासन व तांत्रिक), उपमहाव्यवस्थापक (प्रशासन व तांत्रिक) व उपमहाव्यवस्थापक (वाहतुक) या पदनामाचे सिटीलिंकच्या तसेच मनपा, नाशिकच्या संकेतस्थळावर विस्तृत जाहिरातीत प्रसिद्ध केलेल्या शैक्षणिक पात्रता व अनुभव धारण करत असलेल्या सेवानिवृत्त झालेल्या उमेदवारांची दरमहा एकवट मानधनावर Walk-In-Interview द्वारे कंत्राटी पद्धतीने शासकीय / निमशासकीय सेवेतून वर्ग १ किंवा तत्सम संवर्गातून सेवानिवृत्त कर्मचारी / अधिकारी तात्पुरत्या स्वरुपात अकरा महीने कालावधी पर्यंत नेमणुक करावयाची आहे. उपरोक्त पदांवर कंत्राटी तत्वावर कार्य करण्यास इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड मध्ये जनरल मॅनेजर ॲडमिन आणि टेक्निकल, डेप्युटी जनरल मॅनेजर (ऑपरेशन, ॲडमिन आणि टेक्निकल) ही 03 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 60,000/- ते रु. 75,000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. तुम्ही ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज दाखल करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: gmadmin_citilinc@nmc.gov.in निवड प्रक्रिया ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 28 फेब्रुवारी 2025 आहे तर मुलाखतीची पत्ता: सिटीलिंक भवन, वीर सावरकर तरण तलाव समोर, नाशिक- ४२२००२. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.