
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
चांगल्या वेतनाची नोकरी पाहिजे असेल तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर व्दारे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये नगररचनाकार, सहायक विधी अधिकारी, लघुलेखक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. सदर पदांचा सुरवातीचा कालावधी हा सहा महिने एवढा राहील, आवश्यकता भासल्यास सदर कालावधीत वाढ करण्याबाबतचा अधिकार हा मा. सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर यांचा राहील.
याकरीता निवड झालेल्या उमेदवारांना सदर निवडीवर कोणताही हक्क सांगता येणार नाही व आपणास कोणतीही पुर्वसुचना न देता कामावरुन कमी करण्याचा अधिकार कार्यालय प्रमुख या नात्याने मा. सभापती, नागपूर सुधार प्रन्यास यांचा राहील. अर्जदार यांनी आस्थापना अधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास, स्टेशन रोड, सदर, नागपूर- 440001 या पत्यावर दि. 28/06/2024 पर्यंत अर्ज सादर करावा, त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाही अथवा सदर अर्जावर विचार केला जाणार नाही.