पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरी शोधताय? आदिवासी विकास विभाग अंतर्गत मोठ्ठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 0611 पदे भरली जात आहेत. 12 ऑक्टोंबर 2024 पासून या भरतीला ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. शैक्षणिक पात्रता 10वी / 12वी / पदवीधर व इतर व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
पदांची नावे, पुर्ण शैक्षणिक पात्रता व व्यवसायिक पात्रता जाणून घेण्यासाठी वरती देण्यात आलेली pdf जाहिरात पहा. निवडीची पद्धत :- सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल. संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणान्या ऑनलाईन परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील. ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवुन एकूण २०० गुणांची असेल. परिक्षा कालावधी दोन तासांचा राहील. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली आलेली pdf जाहिरात पहा.