
जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र शैक्षणिक सेवा भरती 2025 साठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये अ {सिव्हिल सर्जन, शरीर तज्ज्ञ, मानसोपचार, अस्थिव्यंग, बहिरेपणा तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सक), एक्स-रेडिओलॉजिस्ट, नेत्ररोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (कान, नाक व घसा तज्ज्ञ), वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोगतज्ज्ञ) आणि प्रसूती तज्ञ)} ही एकूण 320 पदे भरली जात आहेत.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही एमबीबीएस, पीजी डिग्री किंवा पीजी डिप्लोमा, एमडी, एमएस. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी 19 – 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट) वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलाविण्याकरिता पात्र असणार नाही. चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल.
मुलाखतीमध्ये किमान ४१% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल. प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ ( सेवाप्रवेश नियम) २०२१, तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणा-या कार्यनियमावली / कार्यपध्दतीनुसार राबविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 फेब्रुवारी 2025 ही आहे.