NHM भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण | आजचं अर्ज करा | पुर्ण PDF जाहिरात व अर्ज येथे उपलब्ध.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 15व्या वित्त आयोगांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदीर प्रकल्पासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आरोग्य विभागात नोकरीची ही एक उत्कृष्ट संधी आहे. या भरती अंतर्गत एमपीडब्ल्यू (MPW) आणि स्टाफ नर्स या पदांची भरती करण्यात येणार आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी. एमपीडब्ल्यूसाठी दरमहा ₹18,000 तर स्टाफ नर्ससाठी दरमहा ₹20,000 इतके मानधन देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने समक्ष सादर करावा. Pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे तसेच खुल्या प्रवर्गासाठी ₹500 आणि राखीव प्रवर्गासाठी ₹250 चा Demand Draft “Aurangabad City Urban Health Society, Municipal Corporation, Aurangabad” या नावाने जोडणे बंधनकारक आहे. उमेदवाराने एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करत असल्यास स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र धनादेश आवश्यक आहे. निवड प्रक्रिया गुणवत्तेनुसार केली जाईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2025 आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.aurangabadmahapalika.org ला भेट द्यावी व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप Follow करा ➤ MN Nokari Logo