NHM BHARTI 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अंतर्गत जिल्हयातील ग्रामिण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्याकरिता जिल्हयातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. तरी सदर Block Public Health Units (BPHU) करिता तसेच जिल्ह्यातील तालुक्यातील खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.
NHM BHARTI 2024 : National Health Mission, District Integrated Health and Family Welfare Society, within the district are inviting applications from eligible candidates to fill the vacant posts at all Municipal Council and Nagar Panchayat level in order to strengthen the health services in the rural areas of the district.
◾भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : 18,000 ते 35,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज शुल्क :
▪️ खुल्या प्रवर्गासाठी – 150/- रुपये.
▪️ राखीव प्रवर्गासाठी – 100/- रुपये.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ : आरोग्य विषयात MPH/MHA/ MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
▪️MPW-पुरुष : १२वी पास विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
▪️स्टाफ नर्स : G.N.M./ B. Sc. नर्सिंग.
◾रिक्त पदे : 030 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : चंद्रपुर. (Jobs in Chandrapur)
◾वरील सर्व पदे ही कंत्राटी स्वरुपाची एकत्रित मानधनाची असुन मा. आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार व राष्ट्रीय आरोग्य अभियान पुढे सुरु राहिल्यास पुनर्नियुक्तीव्दारे वाढविण्याची कार्यवाही केली जाईल.
◾केंद्र /राज्य शासनाने संबंधित पदे नामंजूर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पुर्वसुचना न देता समाप्त करण्यात येईल व याबाबत कुठलीही तक्रार व गन्हाणी ऐकुण घेण्यात येणार नाही.
◾अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेल्या गुणांची टक्केवारी अचुकपणे नमुद करावी. ग्रेड अथवा अन्य श्रेणी नमुद न करता गुणांची टक्केवारी नमुद करणे अनिवार्य आहे. प्रमाणपत्रात नमुद गुणांची टक्केवारी व अर्जात नमुद टक्केवारी न जुळल्यास असे अर्ज नामंजूर करण्यात येईल. अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवर श्रेणी नमुद असल्यास संबंधित संस्थेकडून त्याचे गुणांमध्ये रुपांतर करुन ते संबंधित संस्थेकडुन प्रमाणित करुन ते अर्जासह सादर करावे.
◾कामाचा अनुभव हा शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांचाच ग्राहय धरण्यात येईल. तसेच ज्या पदाकरिता अर्ज केला आहे, त्या पदाकरिता आवश्यक असलेला किंवा त्या पदाशी निगडीत असलेलाच अनुभव ग्राहय धरण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर अनुभव असल्यास असा अनुभव विचारात घेतला जाणार नाही.
◾जाहिरात प्रसिध्द झाली त्या दिवशीची वयोमर्यादा: १) वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे राहील, २) राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत कर्मचाऱ्यांकरीता कमाल सेवा प्रवेश मर्यादा ५ वर्षापर्यंत शिथील राहील.
◾शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे राहील. तथापी संबंधितांनी जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.
◾उपरोक्त पदांपैकी तांत्रिक पदांकरिता उदा. वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स ईत्यादी पदांकरिता तत्सम कौन्सिलचे वैध नोंदणी प्रमाणपत्र तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरिता महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील. अन्यथा उमेदवारांस अपात्र ठरविण्यात येईल.
◾उमेवारांस एकापेक्षा जास्त अर्ज सादर करावयाचे असल्यास प्रत्येक पदांकरिता स्वतंत्र अर्ज करावा लागेल. अर्ज करीत असलेल्या पदाचे नांव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरिता नमुद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग) अर्जामध्ये स्पष्टपणे नमुद करावा.
◾राखीव संवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्या संवर्गाची वैध प्रमाणपत्रे (Caste Certificate/Validity Certificate) जोडणे आवश्यक आहे. वैध प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही व अशा उमेदवारांना राखीव संवर्गाचा लाभ येणार नाही.
◾अर्जासोबत सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांच्या स्वःसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती- १) पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण झाल्याचे अंतिम वर्षाचे गुणपत्रक (Final Year Marksheet) तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्रे
२) शाळा सोडल्याचा/जन्मतारखेचा दाखला.
३) अनुभवाची प्रमाणपत्रे.
४) जात प्रमाणपत्र
५) तत्सम कौन्सिलचे वैध नोंदणी प्रमाणपत्र.
◾इच्छुक उमेदवारांनी यासोबत देण्यात आलेल्या अर्जाच्या नमुन्यात A4 Size आकाराच्या पांढऱ्या जाड कागदावर प्रिंट करुन सुवाच्य अक्षरात भरलेला अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रांसह सादर करावा.
◾खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु. १५०/- व राखिव प्रवर्गातील उमेदवारांनी रु. १००/- चे राष्ट्रीयकृत बँकेचे डिडि अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. सदर डिडि मागे उमेदवाराने स्वतःचे नांव व अर्ज केलेल्या पदांचे नांव लिहावे.
◾निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾सदर रिक्त पदांच्या संख्येत तसेच पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल होऊ शकतो.
◾उमेदवारांनी उपरोक्त प्रमाणे संपूर्ण दस्ताऐवज लिफाफयामध्ये सिलबंद करुन अर्ज करीत. असलेल्या पदाचे नाव तसेच उमेदवाराचे संपूर्ण नाप, पत्ता व मोबाईल क्रमांक लिफाफयावर नमुद करुन सादर करावे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रूग्णालय परिसर, रामनगर चंद्रपूर.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.