NHM BHARTI 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यांत येणाऱ्या कार्यक्रमांसाठी PHNI, वरिष्ठ परिचारिका मिडवाइफरी ट्यूटर, वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी शाखा सदस्य, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ या पदे संवर्गनिहाय भरण्यासाठी खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान, उपसंचालक, आरोग्य सेवा द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
NHM BHARTI 2025 : Applications are invited for the following posts to be filled cadre-wise for the programs to be implemented under the National Health Mission: PHNI, Senior Nurse Midwifery Tutor, Medical Officer, Contract Branch Member, Senior Laboratory Technician, Laboratory Technician, X-Ray Technician.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, उपसंचालक, आरोग्य सेवा द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : विविध पदे. (अधिकृत pdf जाहिरात वाचा.)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 50 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️PHNI : B.Sc., नर्सिंग प्रशिक्षण केंद्रात किमान ३ वर्षांचा अध्यापन अनुभव आणि M.S. C.I.T.
▪️सिनियर नर्स मिडवाइफरी ट्यूटर : M.SC. नर्सिंग ३ वर्षांचा अनुभव.
▪️वैद्यकीय अधिकारी : M.B.B.S. किंवा B.A.M. S. (एमबीबीएस पदवीधारकांना प्राधान्य).
▪️फॅकल्टी सदस्य : आरोग्य सहाय्यक किंवा आरोग्य नर्स परीक्षा उत्तीर्ण (आरोग्य सेवेतून निवृत्त आणि प्रशिक्षण अनुभवास प्राधान्य)
▪️सिनियर लॅबोरेटरी टेक्निशियन : M.Sc. मेडिकल मायक्रोबायोलॉजी/अप्लाइड मायक्रोबायोलॉजी/जनरल मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/बायोकेमिस्ट्री DMLT सह किंवा त्याशिवाय (टीबी बॅक्टेरियोलॉजीमध्ये ३ वर्षांचा कामाचा अनुभव)
▪️प्रयोगशाळा टेक्निशियन : इंटरमीडिएट (१०+२) आणि मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन किंवा समकक्ष डिप्लोमा किंवा प्रमाणित अभ्यासक्रम.
▪️एक्स-रे टेक्निशियन : सायन्ससह १२ वी उत्तीर्ण. रेडिओग्राफीमध्ये डिप्लोमा.
◾एकूण पदे : 011 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर.
◾उपरोक्त नमुद केलेले पदे ही ११ महिने २९ दिवस या कालावधीसाठी कंत्राटी तत्वावर कराराद्वारे भरणेत येत आहे.
◾खुल्या प्रवर्गातील उमेदबांरासाठी रु १५०/- व राखील प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु १००/- इतक्या रकमेचा नोंदणी शुल्क सोबत जोडण्यात आलेल्या QR CODE (“Deputy Director Of Health Society Nagpur”) or UPI ID: 90885990431@sbi व्दारे जवा करावयाचे आहे. तसेच नोंदणी शुल्क अदा केल्याचा Transaction ID No. पोच पावती (Payment slip) अर्जासोबज जोडणे बंधनकारक आहे.
◾अर्जासोबत शुल्क अदा केल्याची पोच पावती सादर न केल्यास सदरील अर्ज बाद करण्यात येईल याची उमदवाराने नोंद घ्यावी.
◾वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकिय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु नाहीत.
सर्व पदांसाठी उमेदवारांनी सर्व शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे, तसेच पदवीचे सर्व गुणपत्रक (पहिले वर्ष ते अंतिम वर्ष), पदवी प्रमाणपत्र, नोदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणूण (१० व १२ वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला) ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत झेरॉक्स प्रतीत (साक्षांकित/स्वसाक्षांकित) जोडावीत.
◾एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करावायाचा असल्यास उमेदवाराने स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र नोंदणी शुल्क अदा केल्याचा Transaction ID No. पोच पावती (Payment slip) अर्जासोबज जोडणे बंधनकारक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : १२ मार्च २०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : • राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूर (सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर) माता कचेरी परीसर, श्रध्दानंदपेठ, नागपूर-४४००२२
• राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर, माता कचेरी परीसर, श्रध्दानंद पेठ, दिक्षाभूमीजवळ, नागपूर ४४००२२
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.