NHM BHARTI 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, १५वा वित्त आयोग, राष्ट्रीय आयुष अभियानातील जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावरील विविध कार्यक्रमातील रिक्त पदांची पदभरती करावयाची आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांनी परिपुर्ण भरलेल्या विहित अर्जासहित शैक्षणिक अहर्तेच्या छायांकित प्रती व डीडी सोबत आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत. या भरती मध्ये तब्बल 0137 पदांची भरती होत आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
NHM BHARTI 2025 : NHM is recruiting for 137 new posts. Interested and eligible candidates should submit their applications along with the duly filled prescribed application form along with photocopies of educational qualifications and DD as soon as possible. A total of 0137 posts are being recruited in this recruitment.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोयायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य क्षेत्रात नोकरीची उत्तम संधी आहे.
◾एकूण पदे : तब्बल 0137 जागा भरल्या जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी / पदवीधर व इतर पात्रता. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 17,000 ते 60,000 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
Pdf जाहिरात व अर्ज | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे.
◾पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), डीपीएम (एनएचएम), जिल्हा क्यूए समन्वयक, स्टाफ नर्स, पोषणतज्ञ/खाद्य प्रात्यक्षिक, आरबीएसके- कार्यक्रम समन्वयक, लेखापाल, सुविधा व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी (१५ वे वित्त), एमपीडब्ल्यू आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक.
◾इतर आवश्यक पात्रता : 12वी विज्ञान / पदवी पदवी आणि एमबीए / मास्टर्स / पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा / B.E. किंवा B.Sc. किंवा डिप्लोमा / बी.कॉम. / MSW किंवा MA / GNM किंवा B.Sc. / कोणताही वैद्यकीय पदवीधर / एमबीबीएस / बीएएमएस.
◾अर्ज शुल्क :
▪️खुल्या प्रवर्गातील – ३००/- रु
▪️राखीव प्रवर्गातील – १५०/- रु.
◾नोकरी ठिकाण : अहमदनगर (अहिल्यानगर)
◾भरती कालावधी : सदर सेवा ही निव्वळ कंत्राटी स्वरुपाची असून (११ महिने २९ दिवसांच्या कालावधी करिता आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधारीत असेल.
◾अर्जदार हा संबंधित पदासाठी शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा, तसेच अर्जदार विरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
◾अर्जदारास एका पेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज त्या पदासाठीच्या शुल्कासह सादर करावा.
◾सदर पदभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती खालील नमुद संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमेदवारांनी http://nagarzp.gov.in या संकेतस्थळास वेळोवेळी भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे, अनिवार्य राहील.
सदर पदभरती प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे वा सदर पदभरती अंशतः किंवा पुर्ण रदद् करण्याचे अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, अहिल्यानगर यांनी राखून ठेवले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 जून 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कार्यालय, जिल्हा परिषद, अहमदनगर.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.