डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांची राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये भरती सुरू! | वेतन – 18,000 ते 40,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा

आरोग्य विभाग मध्ये चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी द्वारे डाटा एंट्री ऑपरेटर, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सुविधा व्यवस्थापक ई-एचएमआयएस, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक ही एकूण 14 भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नियम व अटी : सेवानिवृत्त कर्मचारी यांची निवड झाल्यास त्याचे मानधन राज्यस्तरावरुन प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार मोजमाप करुन अदा करण्यात येईल. तसेच रुजू होण्याकरीता त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय, परभणी यांचे शारिरीक व मानसिक दृष्टया सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

उपरोक्त पदभरतीबाबत असलेल्या सर्व सूचना हया जिल्हा परिषद, परभणीचे अधिकृत संकेतस्थळ www.zpparbhani.gov.inwww.parbhani.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, याबाबत उमेदवारांना कोणत्याही सूचना, दुरध्वनी निरोप, एसएमएस किंवा ईमेल केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी. उमेदवारांना वेळोवेळी संकेतस्थळास भेट देऊन माहिती घेणे अनिवार्य राहील. अर्जा सोबत उमेदवाराने अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, जि.प. परभणी या नावे देय असलेला खुल्या प्रवर्गासाठी रु.१५०/- व मागासवर्गीय रु.१००/- चा ना परतावा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (DD) जोडावा. चेक अथवा डिडि काढण्यासाठी बँकेत पैसे भरलेली स्लिप ग्राहय धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्जदाराने अर्ज सादर करतेवेळेस जिल्हा परिषद परभणी अथवा एनआयसी परभणी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहीरातीमधील अर्जाचा नमुन्यामध्ये उमेदवाराचे अर्ज स्विकारले जातील इतर कोणत्याही नमुन्यामध्ये उदा. स्वतःचा टंकलिखीत केलेला, नमुन्यामध्ये बदल असलेला इतर अर्ज विक्री केंद्राच्या नावानुसार असलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!