
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
शुद्धिपत्रक | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर येथे सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, एमपीडब्ल्यू -पुरुष आणि कर्मचारी परिचारिका ही एकूण 30 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण, कोणताही वैद्यकीय पदवीधर, जी.एन.एम. / बी. एससी. उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 18,000/- ते रु. 35,000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 15 ऑक्टोबर 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे. सदर रिक्त पदांच्या संख्येत तसेच पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल होऊ शकतो. यामध्ये सर्व अधिकार हे या कार्यालयाचे असुन निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचेकडे राखून ठेवण्यात आलेले आहे. सदर रिक्त पदांसाठी आवश्यक पात्रता असलेला अर्जदार न मिळाल्यास किंवा आवश्यक त्या संख्येत अर्जदार न मिळाल्यास त्या पदाकरिता असलेली पात्रता (अर्हता व अनुभव) आवश्यकतेनुसार शिथील करण्यात येईल. तसेच राखीव प्रवर्गाचे उमेदवार पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध न झाल्यास पदांच्या भरतीची आवश्यकता लक्षात घेता प्रतिक्षा यादीतील उमेदवाराला खुल्या प्रवर्गात तात्पुरती नेमणुक देण्यात येईल.
उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परीसर, रामनगर चंद्रपूर येथे दि. 28/10/२०२४ सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवसवगळुन पोस्टाव्दारे किंवा व्यक्तीशः सादर करावे. त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्विकृत करण्यात येणार नाही, यांची उमेवारांनी नोंद घ्यावी. उपरोक्त पदांकरीता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांकरीताच राबविण्यात येईल. पात्र/अपात्र उमेदवारांची यादी तसेच सदर पदभरती संदर्भातील वेळोवेळी प्रकाशित करण्यात येणाऱ्या सुचना फक्त जिल्हा परिषद चंद्रपूर च्या संकेतस्थळावर (वेबसाईडवर) (https://zpchandrapur.co.in/) तसेच अर्ज केलेल्या ठिकाणी नोटीस बोर्डवर प्रकाशित करण्यात येईल. याची वेगळी सुचना उमेदवारांना दिली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोद घ्यावी. 30 ऑक्टोबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रूग्णालय परिसर, रामनगर चंद्रपूर हा आहे.