
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. राष्ट्रीय व्हयरल हिपॅटायटीस नियंत्रण (NVHCP) कार्यक्रमातील रिक्त असलेल्या Peer Supporter या पदाकरीता दिनांक २९ जुन २०२५ पर्यंत करार / कत्राटी पध्दतीने भरण्यासाठी आर्हताप्राप्त ईच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
नियम व अटी : विहीत नमूण्यात नसलेले, विहीत मुदतीनंतर आलेले, अपर्ण दस्ताऐवज असलेले, अपुर्ण भरलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जावर विहीत ठिकाणी अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो लावावा. भरती प्रक्रिये दरम्यान ज्या-ज्या वेळी उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थिती करीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देय राहणार नाही. भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांने चुकीची माहीती सादर केल्याचे, कोणतीही माहीती दडवुन ठेवल्याचे, दबाव तंत्राचा वापर किंवा अनूचित मार्गाचा अवलंब केल्याचे आढळुण आल्यास कोणत्याही टप्यावर त्यांची उमेदवारी/नियुक्ती कोणतीही पुर्वसूचना न देवा रद्द करण्यात येईल.
अनूभव (शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था) असल्यास त्याप्रमाणे उमेदवाराना अतिरीक्त गुण देण्यात येईल. उमेदवाराने अर्जावर त्यांचे अदयावत असलेले ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक अचूक नोंदवावे. तसेच ते भरती प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र नागरी सेवा नियम २००५ अन्वये लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन नमूना-अ या प्रपत्रात अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. उमेदवाराने अधिवास व राष्ट्रीयत्वाचे सक्षम अधिकाऱ्याकडून प्राप्त केलेले प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार, पदे कमी ज्यास्त करणे, भरती प्रक्रिया रह करणे ईत्यादी सर्व अधिकार मा. अध्यक्ष निवड समिती तथा जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांचेकडे राखून ठेवण्यात आलेले आहे.