
PDF जाहिरात व अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
जे उमेदवार आरोग्य विभाग मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक मध्ये तब्बल 0250 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, सर्जन, बालरोगतज्ञ, एसएनसीयू (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), मानसोपचारतज्ज्ञ (भाग-पॉलिकलिनिक), पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, १५ वा वित्तपुरवठा – स्टाफ नर्समहिला, १५ वा वित्तपुरवठादार-स्टाफ नर्स पुरुष, १५ वा वित्तपुरवठादार-एमपीडब्ल्यू (पुरुष) ही पदे भरली जात आहेत. तुम्ही पात्र असाल तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजुर कंत्राटी पदांपैकी रिक्त पदे भरण्याकरिता विविध कार्यक्रमांमधील रिक्त पदांची जाहिरात nmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांनी सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून अर्ज विहित केलेल्या पध्दतीनुसारच सादर करावा, अर्जामध्ये दिलेली माहिती व कागदपत्रे यांच्या आधारे उमेदवाराची पात्रता/अपात्रता तपासण्यात येईल व त्या आधारे त्याचा समावेश पुढील निवड प्रक्रियेत करण्यात येईल, तथापि, अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवार त्या कंत्राटी पदाकरीता पात्र आहे असा अर्थ होणार नाही. निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी किंवा निवडीनंतर अर्जदार विहित अर्हता धारण करीत नसल्याचे किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवाराची उमेदवारी या निवड तात्काळ रदद करण्यात येईल.
◾अर्जु स्विकृत दिनांक 10/03/2025 ते 24/03/2025 (शासकिय सुटट्या वगळुन /कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
◾अर्ज स्विकृत ठिकाण : राष्ट्रिय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक.
◾अर्ज स्विकृत वेळ : सकाळी 10.30 ते 5.00 वाजे.
◾अर्ज स्विकृती पध्दत : रजिष्टर टपालाने किंवा हस्तदेय प्रत्यक्ष कार्यालयात.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.