PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नागपूर महानगरपालिका येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), नर्स परीचारीका (जी.एन.एम), वृक्ष अधिकारी, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 0245 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी वयोमर्यादा ही मागासवर्गीय: 18 वर्षे ते 43 वर्षे, खुल्या प्रवर्गातील उमेदवार: 18 वर्षे ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
जे उमेदवार नागपूर (Government Job in Nagpur) येथे नोकरी शोधत असतील त्यांना चांगली संधी आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकणार आहेत. परीक्षा शुल्क: अराखीव: रुपये १०००/-, मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक / अनाथ: रुपये ९००/- रूपये आकारले गेले आहे. नियम व अटी : परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व प्रवर्गनिहाय पद संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार मा. आयुक्त तथा प्रशासक, नागपूर महानगरपालिका यांचे कडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
अद्ययावत नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिका-याने वितरीत केलेले व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याच्या सूचना नागपूर महानगरपालिकेचे https:// www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नागपूर महानगरपालिका येथे अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत ऑनलाईन स्वरुपात विविध संवर्गाकरिता नमूद आवश्यक परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ऑनलाईन स्वरुपात फी चा भरणी केल्यानंतर अर्ज “Your Application is Successfully Submitted” असा मॅसेज येईलपर्यंत उमेदवारांना लॉग आऊट करू नये, अर्ज Successfully Submit झाल्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधीत उमेदवारांची राहील.
पात्रता / आरक्षणा संदर्भात अर्जामध्ये निर्विवादपणे दावा केलेला असणे आवश्यक आहे. अर्जामध्ये प्रत्येक दाव्याच्या पुष्टयार्थ आवश्यक कागदपत्राची पुर्तता केल्याशिवाय पात्रता/आरक्षणाचा दावा ग्राहय समजला जाणार नाही. अर्जदाराने त्याचे पात्रते संदर्भातील सर्व आवश्यक दस्तऐवज / प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीचे वेळो उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी/रहीवासी असावा आणि महाराष्ट्रात १५ वर्ष अधिवास (Domicile) करीत असल्याबाबत त्याने सक्षम प्रधिकरणाचे किंवा महाराष्ट्रात जन्म झाल्याबाबत जन्मदाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.
निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर उमेदवारांची निवड झाल्यावर किंवा नियुक्ती दिल्यानंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांचे अर्जात व ऑनलाईन परिक्षेचे वेळी दिलेली माहिती अगर कागदपत्रे खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवारांची उमेदवारी निवड, नियुक्ती कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल याबाबत कोणताही पत्र व्यवहार विचारात घेतला जाणार नाही. 26 डिसेंबर 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2025 ही आहे.